Homeकोंकण - ठाणेवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची रू.३१०० /- प्रमाणेऊस बिले जमा.🛑ग्रामस्थ मंडळ घाटकरवाडी...

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची रू.३१०० /- प्रमाणेऊस बिले जमा.🛑ग्रामस्थ मंडळ घाटकरवाडी आयोजित.- भव्य खुल्या हाफ स्पीच (अंडर आर्म) क्रिकेट स्पर्धा.🛑काही लाडक्या बहिणी देखील होणार अपात्र.. योजनेचे गाजर फक्त निवडणुकीपुरते ? तर – कुटुंबातील एकालाच आता मिळणार पीएम किसानचा लाभ.‌

🛑 वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची रू.३१०० /- प्रमाणे
ऊस बिले जमा.
🛑ग्रामस्थ मंडळ घाटकरवाडी आयोजित.- भव्य खुल्या हाफ स्पीच (अंडर आर्म) क्रिकेट स्पर्धा.
🛑काही लाडक्या बहिणी देखील होणार अपात्र.. योजनेचे गाजर फक्त निवडणुकीपुरते ? तर – कुटुंबातील एकालाच आता मिळणार पीएम किसानचा लाभ.‌

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आजअखेर १३३४५० मे. टन ऊसाचे गाळप झाले. कारखान्याकडे दि. १७/११/२०२४ ते ३०/११/२०२४ आज अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन रू.३१००/- प्रमाणे विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली. हंगाम २०२४/२५ मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळपाचे नियोजन केले असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून त्यापासुन जास्तीत जास्त साखर उत्पादन मिळविणेचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा कार्यक्षेत्रात लावुन प्राधान्याने ऊसाची उचल करणेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपूर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जाणार आहेत.

कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणुन ऊस उत्पादकांना दिलासा दिला जाणार आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेला ऊस वेळेत गाळपास आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. सद्या कार्यक्षेत्रातील हत्ती. गवे इत्यादी जंगली प्राण्यांनी नासधूस केलेल्या ऊसाचे तोडणीस प्राधान्य दिले जात आहे. सदर बाधीत क्षेत्र आटोक्यात येताच ज्या गावात यंत्रणा नाही किंवा अपुरी आहे तेथे प्राधान्याने यंत्रणा लावुन ऊस उचल करीत आहोत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यानी केले.

Oplus_131072

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखानचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील. संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक, नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

🛑ग्रामस्थ मंडळ घाटकरवाडी आयोजित.- भव्य खुल्या हाफ स्पीच (अंडर आर्म) क्रिकेट स्पर्धा.

आजरा.- प्रतिनिधी.

घाटकरवाडी ता. आजरा येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने
भव्य खुल्या हाफ स्पीच (अंडर आर्म) क्रिकेट स्पर्धा शुक्रवार ०३/०१/२०२५ व शनिवार ०४/०१/२०२५ रविवार ०५/०१/२०२५ सकाळी ०९.०० वाजता सुरू होत आहेत तरी इच्छुक संघांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन ग्रामस्थ मंडळांने केले आहे.‌

चौकट.

या स्पर्धेसाठी बक्षिसे
प्रथम क्रमांक:-७१०१/-
द्वितीय क्रमांक:-५२२२/- कु
तृतीय क्रमांक:-३१०१/- श्री
चतुर्थ क्रमांक- १५००/- श्री
प्रवेश फी ३५०/- फक्त
टीप:- प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक बक्षिसे
री-एन्ट्री २२०/- नियम व अटी :-
१) प्रत्येक संघात ९ खेळाडू राहतील
२) पंचाचा निर्णय अंतिम राहील
३) एक खेळाडू एका संघात खेळेल
४) नियम बदलण्याचा अधिकार कमिटीकडे राहतील
५) खेळाडूला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार नाही
६) इतर नियम व अटी मैदानाल सांगण्यात येतील

तरी या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन घाटकरवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी केले आहे.‌

🛑काही लाडक्या बहिणी देखील होणार अपात्र.. योजनेचे गाजर फक्त निवडणुकीपुरते ? तर
कुटुंबातील एकालाच आता पीएम किसानचा लाभ.‌
( अनेकांचा होणार पत्ता कट, नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पेन्शनर, आयकर भरणारे वळणार.)

संपादकीय.- संभाजी जाधव.

Oplus_131072

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व महिलांना ज्या योजनेपासून लाभ मिळत होता. व अशा योजनेमुळे महायुती सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत आली. त्या योजनेमध्ये आता निकष आणून अनेकांना अपात्र करण्यात येणार आहे. पी. एम. किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू करून नियोजनाचा अभाव असल्याचे सिद्ध केले आहे. मुळात ही योजना चालूच करताना मग अशा पद्धतीने का चालू केली हे निकष पूर्वीच का? लावले नव्हते असा प्रश्न उपस्थित होते.
ज्या शेतकन्यांनी २०११ पूर्वी जमीन खरेदी केली आहे. सह अन्य शेतकऱ्यांना यापुढे पीएम निकषात बसत असतील तरच लाभ मिळणार आहेत.‌

हे आहेत नवीन नियम

१ लाभार्थीच्या नावावर २०११ पूर्वी जमिनीची नोंद असावी.

शेतकरी पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात त्यांना या योजनेचा लाभही मिळतो. मात्र, काही हमी मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितले जाते. एकदा आवश्यक कागदपत्रे केल्यानंतर संबंधित शेतकयांची ती कागदपत्रे असूनही वारंवार ई-केवायसी करायला का सांगितली जाते ? हा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. पण याबाबत आता शेतकरीही म्हणू लागला आहे. कि हा कोणता जुमला आहे.‌

योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकयांना आर्थिक हातभार हा हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकयांना मदत त्याचे जाहीर केले. त्यानुसार योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ करण्यात आली तेव्हापासून देण्यात येत आहे.‌

२०१९ नंतरची जमीन खरेदी, खातेफोड, बक्षीसपत्र असल्यास त्याला लाभ मिळणार नाही.

लाभार्थीच्या नावावर एक फेब्रुवारी २०१९ नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाल्यास लाभ मिळणार

कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी एकच व्यक्ती पात्र ठरणार

🛑 लाभार्थी शासकीय, निमशासकीय, शासन अंगीकृत संस्था, स्वायत संस्थेचा कर्मचारी नसावा

केवायसीसाठी सात दिवसांचीच मुदत

पंतप्रधान किसान सन्मान योजनाअंतर्गत अपात्र असलेल्या अपात्र लाभार्थीची यादी कृषी विभागाकडे पहाणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे लाभार्थी पात्र असूनही त्यांचे नाव अपात्र यादीत आलेले आहे. त्या शेतकन्यांनी त्यांच्या त्यांच्या गावातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधून पात्रतेसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करावी. केंद्र शासनस्तरावरून त्या योजनेच्या लाभार्थीचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीची पडताळणी करून सात दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यानंतर उर्वरित लाभार्थीची यादी अपात्र महणून शासनास कळवण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी या योजनेस पात्र होणार नाहीत, असे कृषी विभागाकडून समजते.

ज्या वेळी ही योजना सुरु झाली. त्या वेठी एकाच मुलीला यांनी त्यांच्या नावावर असलेल्या

लाभार्थी शासनाचा निवृत्ती वेतनधारक (पेन्शनर) नसावा

शेतजमिनीच्या अनुगाने पीएम किसान एकाच पानवर

लाभार्थी नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट नसावा… असे वेगवेगळे निकष मग आत्ताच कशासाठी…

चौकट.

लाडक्या बहिणीला निवडणुकीपुरते दाखवले गाजर..

विधानसभा निवडणुका पूर्वी एक महिना राज्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेने ज्या सरकारला विधानसभा २०२४ मध्ये सत्तेत आणल्याचे मत स्वतः महायुती सरकार करत आहे. मग आता अशा मध्ये या योजनेमध्ये वेगवेगळे निकष लागू करून अशा अनेक महिलांना अपात्र ठरवण्याचे षडयंत्र सरकारने केले आहे. मग मुळात या महिलांना आपण पात्र का केलात. याचाच अर्थ निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवण्याचे काम महायुती सरकारने केले असल्याचे महिला बोलत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.