परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड निषेधार्थ.- आजऱ्यात मोर्चा निदर्शने.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे विविध संघटना वतीने परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोरील संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून विठंबना केलेल्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन सखोल चौकशी करावी व संबंधितावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय गौरव सन्मान अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात यावी. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन व मागण्या करण्यात आल्या यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दिवगंत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मारहान करून झालेल्या मृत्युबाबत संबंधितावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सर्व संबधितांना अटक करण्यात यावी. दि. ११/१२/२०२४ रोजी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी निदर्शेष निवेदनही जनतेची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. त्यावेळी घडलेल्या घटनेच्या आधारे ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, हे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. उत्स्फुर्त प्रतिक्रिया केलेल्या घटनेवरून पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन करून तरूणांसह निरपराध महिला व लहान मुले मुली वयस्कर ईसमांना तसेच बाळंतीन महिलेला तिच्या बाळासह घरात घुसून मारहान करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. तरी वरील सर्व प्रकरणाची या घटनेशी संबंध नसलेल्या अशा दुसऱ्या विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकांऱ्या मार्फत सखोल चौकशी करून संबंधितावर तात्काळ गुन्हे नोंद करून अटक करण्यात यावी.
या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आंबेडकर आंबेडकर फॅशन हा शब्द वापरून खूप मोठी चुकी केली आहे. या देशाच्या संविधानीक पदावरती बसत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपमानकारक शब्द वापरून या देशामध्ये आराजकता माजवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री करत आहेत. यांच्यावर देखील देश दोहाचा खटला दाखल करण्यात यावा.
पोलीसांनी केलेल्या सरसकट, अंदाजे धरपकडीनंतरच्या कस्ट्रोडीअल हिंसेत विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थांचा परभणीतील उद्रेकाशी कसलाही संबंध नसताना खून झालाय. सरसकट अंदाजे, सुडाने बेकसूरांना ताब्यात घेणे, मरेपर्यंत मारणे हे संविधानिक कृत्य आहे काय? कोणी पोलिसांना एवढी ढील कशासाठी आम्ही संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहोत.’ हे म्हणताना लाज कशी वाटत नाही?
आपण याबाबतीत मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच संबंधित विभागांना जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून आमच्या या भूमिकेबाबत कळवावे. यावर कारवाई व कार्यवाही करण्यासाठीची अंमलबजावणी तात्काळ व्हावी. अशी आमची आग्रहाची भूमिका आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी विविध संघटना चळवळीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये सेक्युलर मुक्मेंट महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन सेना, सर्व श्रमिक संघटना, संघटना, दलित मानवी हक्क वंचित बहुजन युवा आघाडी, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, वंचित बहुजन महिला आघाडी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, मुक्ती संघर्ष समिती,
भारतीय बौद्ध महासभा. आधी चळवळींचा सहभाग होता.
