के. पी. पाटलांच्या धनशक्तीला जनता झुकणार नाही – आमदार प्रकाश आबीटकर २०१४ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार
🛑वारं फिरलय म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली
: आमदार प्रकाश आबीटकर
: पदयात्रेला जनतेतून वाढता प्रतिसाद : विरोधाक घायाळ.
कौलव: प्रतिनिधी.
माजी आमदार के. पी. पाटील यांचा धनशक्तीच्या जोरावर आर्थिक यंत्रणेचा वापर करून माणसं विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जनता उत्स्फूर्तपणे माझ्या पाठीशी असल्याने जनताच त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते कौलव (ता. राधानगरी) येथे कोपरा प्रचारसभेत बोल होते.
आमदार आबीटकर म्हणाले, कौलवकर २०१४ च्या निवडणुकीत ठामपणे पाठीशी राहीले होते. मतदार संघातील ज्या प्रश्नाना कोणीच हात लावला नव्हता असे प्रश्न सोडविले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्यात आर्थिक सक्षमता आणली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कौलवच्या डोंगरावर एमआयडीसी करण्याचा प्रयत्न केला. लोकांचा विरोध घेऊन मला एमआयडीसी प्रकल्प करायचा नाही. प्राधिकरणाच्या माध्यमातून पर्यटन विकास करून या परिसराचे नंदनवन करुया. स्व. दादासाहेब पाटील यांनी साखर कारखाना काढल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली. पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून या भागाचा विकास होईल. कुटुंब प्रमुख, नेतृत्व विचाराचा असेल तर चांगले काम होते. त्यांना मतदार संघाच्या विकासाची पडले नाही तर बिद्रीच्या चिमणीचे पडले आहे. बिद्रीच्या चिमणीत त्यांचा जीव अडकला आहे. या मतदार संघातील एक गाव, एक वाडी दाखवा त्या गावात काम पोहचले नाही. स्व.आ.गोविंदराव कलीकते, स्व.आ.शंकर धोंडी पाटील आणि स्व.खा.सदाशिवराव मंडलिक यांची निवडणूक याच गावाने हातात घेतली होती. मसलींग देवालयाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. यावेळी देखील येथील जनता आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रविश पाटील म्हणाले २०१४ सारखी परिस्थिती असुन निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. नेते मंडळी जरी एका बाजूला असली तरी सर्वसामान्य जनता आ. आबीटकर यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले निवडणूक विधानसभेची आहे आणि के. पी. पाटील कारखान्याचे तुंतूने वाजवत सुटले आहेत. खरे तर त्यानी विकास कामावर बोलायला पाहिजे. त्यांनी केलेली विकास कामे सांगून मते मागावित.
युवक नेते अभिषेक डोंगळे म्हणाले, कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघात घोटवडे गावातून आमदार आबीटकर यांना उच्चांकी मते देऊन विजयात घोटवडे करांचा मोठा वाटा असेल. यावेळी सदाशिव खडके, जनार्दन परितेकर यांची भाषणे झाली.
यावेळी प्रास्ताविक आण्णाप्पा पाटील यांनी केले. डॉ. सुभाष जाधव, शांताराम बुगडे, विजय पाटील कौलकर, रणजीत पाटील माजी सरपंच अमर पाटील कौलकर बाबुराव पाटील पांडुरंग पाटील बळवंत पाटील एम.डी. पाटील, प्रकाश हुजरे, विनायक पाटील, सदाशिव लोहार, सतीश चरापले, विनायक पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार के. द. पाटील यांनी मानले.
चौकट
रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची आ. आबीटकरांकडून पूर्तता…
मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाची सर्व कामे रखडली होती. मात्र आ.आबीटकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावले. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आल्याने शेतकरी आनंदी आहेत. हेच शेतकरी आमदार आबीटकर यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करतील.
🛑वारं फिरलय म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली
: आमदार प्रकाश आबीटकर
: पदयात्रेला जनतेतून वाढता प्रतिसाद : विरोधाक घायाळ
कसबा तारळे : प्रतिनिधी
पदयात्रेमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पदयात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून वारं फिरलय म्हणा-यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विरोधक बेताल वक्तव्य करू लागले आहेत. जनताच त्यांना मतपेटीतून उत्तर देईल असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते कसबा तारळे येथे कोपरा सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार आबीटकर म्हणाले, दोन्ही विधानसभा निवडणुकीत तारळेंकरांनी मोठं मताधिक्य दिले आहे. यामधून उतराई होणे अशक्य आहे. यापुढेही तारळे गावच्या विकासासाठी कटीबद्ध राहिन असे सांगून आ. आबीटकर म्हणाले, अभ्यास करून विकासाचा पेपर सोडविला तर राधानगरी मतदार संघाचे उदाहरण द्यावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या धर्तीवर सीएम किसान योजना, ७.५ एचपी पर्यंत मोटरपंपाना मोफत वीज, मुलींना मोफत उच्य शिक्षणाची सोय, लाडकी बहीण, वयोश्री योजना यांसारख्या विविध योजना राबवील्यामुळे समाजातील सर्व घटक समाधानी आहेत. धामणी प्रकल्पाची मुख्यमंत्री यांच्या हस्ते घळभरणी झाली यामुळे शेतकरी आनंदी आहेत. शेतकरी, तरूण, वयोश्री, विधवा, परितक्त्या या सर्व घटकांसाठी काम केले आहे. प्रचंड प्रमाणात विकास कामे केली आहेत मात्र कमी कालावधीमुळे काही कामांचे शुभारंभ करता आले नाहीत.
यावेळी भाजपचे व्हि. टी. जाधव म्हणाले, आमदार आबीटकर यांनी गटतट न पाहता काम केले. प्रत्येक माणसाचे काम केले. विरोधात असलेले लोक देतील आमदार आबीटकरांना मदत करून विकासाला बळ द्यायचे आहे असे खासगीत बोलतात.
तेजस्विनी पाटील म्हणाल्या आ.आबीटकर यांनी उपजिल्हा रुग्णालय केल्यामुळे राधानगरी व गगन बावडा परिसरातील सुमारे ५० खेड्यातील गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे.
यावेळी संभाजी आरडे, रविश पाटील-कौलवकर, अभिषेक डोंगळे, देवराज बारदेस्कर, उमेश पाटील, सातापा कांबळे, उपसरपंच संदीप पाटील, बळवंत किरूळकर, अमर पाटील, अशोक सरनोबत, रमेश साबळे, चंद्रकांत पाटील, नितीन पोतदार आ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीधर चव्हाण यांनी केले. आभार नितीन पोतदार यांनी मानले.
चौकट :
उपजिल्हा रुग्णालयाची वास्तु वर्षभरात उभी राहिल…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्यामुळे कसबा तारळे येथील उपजिल्हा रुग्णालयास सुमारे २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वर्षभरात अद्यावत इमारत उभी राहिल असे आ. आबीटकर यांनी सांगितले.