आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
आम. प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
आजरा.- प्रतिनिधी.


आजरा येथील आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप व शिंदे सेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात श्री. चराटी यांना शुभेच्छापर सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
अध्यक्षस्थानी आम. प्रकाश आबिटकर होते. स्वागत व प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले राजकारणातलं अजब नेतृत्व म्हणजे अशोक चराटी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त जो मेळावा आयोजित केला आहे. माझ्या प्रचारार्थ. पण सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मी नव्हे जनता आमदार आहे सर्वधर्म समभाव म्हणून मला पाठिंबा देत आहात आयुष्यभर तुमचा ऋणात राहण्याचा प्रयत्न करीन मी सर्वांचा झालो मी तुमच्या आजरेकरांचा झालो.. व तुम्ही माझे झालात कोणत्याही भूलथापांना बळी न पडता खरं खोटं तपासून विकासाला महत्त्व द्या. विरोधकांनी कितीही चुकीचे आरोप केले तरी मी तुमचा व तुम्ही माझे आहात.

महायुती सरकारने महिलांचा स्वाभिमान जागृत करण्याचे काम करत लाडकी बहीण योजना अमलात आणली व यांच्या खात्यावर पैसे जमा केले. ही योजना बंद करण्याचे काम महाविकास आघाडी करत होती पण त्यांना भीक नाही घातली महायुतीने.. आजरा एमआयडीसीची जागा नावावर झाली आहे आज -यात विस्तारित एमआयडीसीचे काम पूर्ण झाले आहे. भविष्यात या एमआयडीसी त नवनवीन व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. आपण या सर्व कामाचे फलित म्हणून मला मताच्या पेटीतून प्रचंड मताधिक्य द्यावे. असे मत श्री. चराटी त्यांच्या वाढदिवसाच्या व निवडणूक प्रचारार्थ मेळाव्यात संबोधित करताना आमदार श्री आबिटकर बोलताना म्हणाले.
यावेळी अशोक चराटी म्हणाले आजऱ्यातील सर्व समाज आपल्या सोबत आहे. आजरा शहराचा झालेला विकास व होणारा उर्वरित विकास याकडे आपण पाहावे व आमदार आबिटकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे. वाढदिवसासाठी आलेल्या प्रचंड जणसमुदाय यांचे धन्यवाद मानले.
चौकट.
या वाढदिवस व प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात. अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखाली.. जाहीर पाठिंबा..
💥बांधकाम कामगार, लाल बावटा
💥गांधीनगर ग्रामस्थ आजरा.
💥ब्राह्मण समाज आजरा.
💥लिंगायत समाज, आजरा.
💥सिद्धार्थ नगर.
💥चर्मकार समाज.
💥नाभिक समाज.
💥लिंगायत समाज.
💥कोरवी कैकाडी समाज
💥मराठा महासंघ.
या समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार प्रकाश आबिटकर यांना जाहीर पाठिंबा दिला.. यावेळी महिला बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी नंदकुमार ढगे गोकुळ संचालक, राहुरी कृषी विद्यापीठ संचालक दत्तात्रय हूगले, राजेंद्र सावंत मारुती मोरे बंडोपंत चव्हाण राजु पोतनीस, आजरा अर्बन चेअरमन रमेश कुरुंनकर डॉ, अनिल देशपांडे, सौ. अंशुमाला चराटी ( पाटील ) विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, भाजप तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, अनिकेत चराटी, माजी नगरसेविका सुमैया खेडेकर, शुभदा जोशी, अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक पदाधिकारी कार्यकर्ते, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. देशपांडे यांनी आभार मानले