HomeUncategorizedजानेवारीतील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊस बिलाची...

जानेवारीतील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात जमा.

जानेवारीतील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात जमा.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे दि. ०१/०१/२०२४ ते १५/१/२०२४ अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात रु.१२,३५,१९,८४८/- संबधित ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग बँक खातेवर जमा करण्यात आली असले बाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी दिली.
हंगाम २०२३/२४ मध्ये करखान्याने किमान ३.०० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असुन त्याकरीता बीड व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा ऊस तोडणी करीता कार्यरत ठेवणेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकच अध्यक्ष मा.ना. हसन मुश्रीफसाहेब, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले विनाकपात एकरक्कमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील नियमीतपणे आदा केली जात आहेत. कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन नवनिर्वाचीत व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणनेस प्राधान्य
दिले जात आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य
कारखान्यांना न घालता कारखान्यास व व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला
संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे
चेअरमन वसंतराव धुरे यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखानचे संचालक विष्णू केसरकर श्री उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे) शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, श्री. गोविंद पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री.नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण आणि प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.