उत्तुर फाट्यावर एसटी व अन्य वहानाचा अपघात.- ड्रायव्हरच्या चलाकीमुळे अनर्थ टळला.- कोणालाही दुखापत नाही.
आजरा.- प्रतिनिधी.
संकेश्वर – बांदा महामार्गाच्या चांगल्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेली एस. टी (बस) तसेच अन्य वहाने वळनावर आलेले त्यांना चुकवण्यासाठी गाडी बाजूला घेतली अपघात होता होता टळला. आजरा गडहिंग्लज MH14 BT905 या एसटी ड्रायव्हर यांनी एसटी रस्त्याच्या बाहेर घेऊन अपघाताचा अनर्थ टाळला.
आजरा तालुक्यातील उत्तूर फाटा नजीक महामार्गाचे काम नव्याने झालेले एसटी व अन्य वहाने भरधाव वेगाने येऊन अपघात होणार याची लागलीच दक्षता आल्याने गाडी रस्त्याच्या बाहेर घेतली परंतु कोणताही मोठा अपघात झाला नाही. किंवा प्रवाशाला दुखापत झाली नाही.
संकेश्वर बांदा महामार्गाचे काम मागील एक वर्षापासून चालू आहे परंतु अशी अनेक वाहने रस्ता कच्चा आहे माहित असताना किंवा गाडी जाण्यास अडचणीचा रस्ता असताना जबरदस्तीने गाडी पास करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामध्ये डंपर ट्रॅक्टर व एसटी ड्रायव्हर आघाडीवर आहेत. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे रस्ता होईपर्यंत प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी चालक व वाहक यांनी जबाबदारीने प्रवासांना पोहोच करणे गरजेचे आहे. कच्च्या रस्त्याने अति वेगाने रस्त्यावर गाड्या धावत असतात पाठीमागून येणाऱ्या टू व्हीलर नागरिकास धुळीच्या साम्राज्यातून प्रवास करावा लागतो याची कोणतीही मोठ्या वाहन चालकांना कळ नसते. यामुळे वाहने सावकाश चालवा व आपल्या सोबत इतरांचीही काळजी करा. अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.
