HomeUncategorizedजानेवारी महिन्यातील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊस...

जानेवारी महिन्यातील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात जमा.🛑आजरा एरंडोळ येथे विधवा महिलांना केले हळदी कुंकूने सन्मानित.

🛑जानेवारी महिन्यातील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात जमा.
🛑आजरा एरंडोळ येथे विधवा महिलांना केले हळदी कुंकूने सन्मानित.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे दि. ०१/०१/२०२४ ते १५/१/२०२४ अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलाची विनाकपात रु.१२,३५,१९,८४८/-इतकी रक्कम संबधित ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग बँक खातेवर जमा करण्यात आली असले बाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी दिली.
हंगाम २०२३/२४ मध्ये करखान्याने किमान ३.०० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असुन त्याकरीता बीड व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा ऊस तोडणी करीता कार्यरत ठेवणेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकच अध्यक्ष मा.ना. हसन मुश्रीफ, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले विनाकपात एकरक्कमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील नियमीतपणे आदा केली जात आहेत. कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन नवनिर्वाचीत व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणनेस प्राधान्य
दिले जात आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य
कारखान्यांना न घालता कारखान्यास व व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला
संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे
चेअरमन वसंतराव धुरे यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखानचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे) शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण आणि प्र.कार्यकारी संचालक.व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

🛑एरंडोळ येथे विधवा महिलांना केले हळदी कुंकूने सन्मानित.

आजरा .- प्रतिनिधी.

जुन्या रिती रिवाजाना फाटा देत, सामाजिक बदलाच्या दृष्टीने, एरंडोळ ग्रामपंचायत व गावातील सर्व महिला बचतगटाच्या संयुक्त विद्यमाने, गावातील विधवा महिलांना हळदी कुंकू व भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले, यावेळी अध्यक्ष स्थानी सरपंच सौ. सरीता पाटील होत्या. स्वागत व प्रास्ताविक सी आर पी रूपाली नेसरीकर यांनी केले, यावेळी गावातील सर्व महिला बचतगटाच्या संकल्पनेतून विधवा महिलांना सन्मान देत, त्याच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमांची सुरुवात करणेत आली. यावेळी सरपंच सौ पाटील यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून गावात जुन्या रिती रिवाजाना फाटा देत, सामाजिक बदलाच्या दृष्टीने महिलाचे प्रश्न महिलांनीच समजून घेणे, आवश्यक असल्याने स्त्री म्हणून विधवाना सन्मानित केल्याने, समाधान व्यक्त केले. यावेळी महिलाच्यासाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया पाटील, सुजाता तळेवाडीकर, सुनिता परिट, शामल सुपल, सुनिता परिट ,सविता कुंभार, सुषमा आतकरी, पार्वती जाधव, प्रमिला जाधव, अनुजा पेडणेकर, वैशाली सुतार याच्या सह गावांतील विधवा महिलाबचतगटाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्या उपस्थित होत्या सुत्रसंचालन बार्देसकर मॅडम यांनी केले, आभार गिता नाईक यांनी मांडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.