HomeUncategorizedकाँग्रेसचे राज्यातील मोठे नेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर.-...

काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर.- अशोक चव्हाण यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा?(🛑तर अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्षाकडे राजीनामा सोपवल्याची सुत्रांची माहीती..)🛑गवसे विभागातील शेतकऱ्यांसाठी महावितरण गडहिंग्लज उपविभाग मार्फत ३३ kv लोकार्पण सोहळा.- आम. आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश.

🛑काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर.- अशोक चव्हाण यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा?
(🛑तर अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्षाकडे राजीनामा सोपवल्याची सुत्रांची माहीती..)
🛑गवसे विभागातील शेतकऱ्यांसाठी महावितरण गडहिंग्लज उपविभाग मार्फत ३३ kv लोकार्पण सोहळा.- आम. आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश.

मुंबई :- प्रतिनिधी.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात काँग्रेस पक्षाला खिंडार पडताना दिसत आहे.काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते,राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.अशोक चव्हाण नॉटरिचेबल आहेत. अशातच भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्ष प्रवेशाची तयारी सुरु आहे.
🛑दरम्यान भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभैची उमेदवारी दिली जाऊ शकते अशीही चर्चा सुरू आहे.तसेच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा समोर येत आहेत. अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर या बातम्या समोर आल्या आहेत. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं म्हटलं जात होतं.
🛑तसेच अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र आता विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. सध्या सुरु असेलल्या चर्चांवर अशोक चव्हाण लवकरच खुलासा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, लातूरमध्ये अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी भाजप प्रवेशाचे स्टेटस ठेवल्याच्याही चर्चा समोर आल्या आहेत. अद्याप अशोक चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून अशोक चव्हाण यांच्या प्रतिक्रियेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. या चर्चा खऱ्या ठरल्यास हा महाराष्ट्र काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का असेल. असे बोलले जात आहे.

🛑गवसे विभागातील शेतकऱ्यांसाठी महावितरण गडहिंग्लज उपविभाग मार्फत ३३ kv लोकार्पण सोहळा.- आम. आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा गवसे विभागातील सुळेरान, धनगरमोळा, घाटकरवाडी, आंबाडे, लिंगवाडी, या विभागातील गावांना शेतीपंपसाठी कमी दाबाने विज पुरवठा होत असल्याची तक्रार आम प्रकाश आबिटकर यांचेकडे तेथील शेतीपंप उरकांनी केली होती त्या अनुषगाने आम. आबिटकर सुचनेनुसार महावितरण गडहिंग्लज उपविभाग मार्फत ३३ kv उपकेंद्र आंबोली ता. सावंतवाडी व सिंधुदुर्ग येथुन नवीन ट्रान्यप्रर डिपी व विदद्युत वहिनी उभी करून येथील शेतकऱ्यांना उच्च दाबाने विज पुरवठा होणेकामी लोकार्पण करणेत आले, याचा फायदा कीटवडे, सुळेरान सह येथील २९० शेतकरी ग्राहकांना मिळणार आहे. याकामी महावितरण कोल्हापुरचे मुख्य अभियंता श्री भागवत, गडहिंग्लज कार्यकारी अभियंता की , उपकार्यकू अभियंता श्री मिसाळ, सहायक अभियंता श्री.पिवल. गड तंत्रज्ञ की संदेश पाटील, कार्यकारी अभियंता चहाण, मंत्री दीपक केसरकर, तसेच कारखाना संचालक गोबिंद पाटील, कीटवडे सरपंच लहु वाकर, सुळेरान सरपंच शशिकांत कांबळे, दाभिल सरपंच युवराज पाटील यांनी मागणी पूर्ण झालेबद्दल आम. आबिटकर व महावितरणचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.