नेटसर्फ कम्युनिकेशन प्रा. लिमिटेड पुणे.- आयोजित आजरा- मडिलगेत शेतकऱ्यांच्या जमिनीचे माती परीक्षण.
आजरा – प्रतिनिधी.

नेटसर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीचे माती परीक्षण शनिवार दिनांक ९ रोजी. मडिलगे येथील ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते. शेतकरी जमिनीमध्ये कबाड कष्ट करतो पण केलेल्या कोणत्याही पिकांचे कष्टाच्या मानाने पीकांचे उत्पादन मिळत नाही. माणसाच्या शरीराला कोणते घटक कमी आहेत किंवा कोणता आजार आहे. हे तपासण्यासाठी रक्त, लघवी तपासावी लागते तशीच आपल्या जमिनीचे माती परीक्षण करावे लागते यासाठी या कंपनीच्या माध्यमातून मडिलगेतील शेतकऱ्यांच्या जमिनीतील मातीचे माती परिक्षण करण्यात येत आहे असे यावेळी सरपंच श्री. निऊगरे यांनी बोलताना सांगितले. शेतकरी व उपसरपंच सुशांत गुरव व उपस्थित शेतकरी यांच्या हस्ते. माती परीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
माती परीक्षण ही काळाची गरज असल्याची कंपनीचे माती परीक्षण सायंटिस्ट सिद्धार्थ कुमार सांगितले व अवघ्या पंधरा मिनिटांत शेतकऱ्यांच्या समोर त्या शेतकऱ्यांच्या समोर मातीचे परीक्षण करून जखमींमध्ये कोणते घटक कमी व अधिक आहेत. यांची माहिती देण्यात आली. माती हि एका ठिकाणी क्षेत्र असलेल्या मधील वावरामध्ये एक फूट खड्डा व त्यातील अर्धा किलो माती घरी आणून सावळी मध्ये आजच वाळवून सकाळी येताना चहाच्या किंवा पिठाच्या चाळणीने चाळून पाव किलो आणावी.
येताना आधार कार्ड व ज्या क्षेत्रातील माती आहे. तो गट नंबर क्रमांक सोबत आणावा. सदर कंपनीच्या माध्यमातून आपल्याला देण्यासाठी जमीन सुपीक व जैविक होण्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. असे अवाहन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी कंपनीचे योगेश श्रीखंडे, तसेच शेतकरी पांडुरंग कुरळे, सागर सुतार, प्रवीण पाटील, मारुती राठोड, रमेश भाईगडे, बाळू भाईगडे, विनायक मुळीक, आनंदा मुरुकटे, सुनिल राठोळ, नामदेव येसने, संभाजी जाधव सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अल्प दरात २५ शेतकऱ्यांचे जमिनीच्या मातीचे माती परीक्षण करण्यात आले. आजरा तालुक्यातील कोणत्या गावात शेतकऱ्यांचे माती परीक्षण करायचे असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी कंपनीची संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
श्री श्रीखंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.
