HomeUncategorizedभाजप सरकारने थेट लाभार्थ्यांना पारदर्शकपणे लाभ दिला.- राजे समरजितसिंह घाटगे.( गाव चलो...

भाजप सरकारने थेट लाभार्थ्यांना पारदर्शकपणे लाभ दिला.- राजे समरजितसिंह घाटगे.( गाव चलो अभियान अंतर्गत साधला लाभार्थ्यांशी संवाद.)🛑आजरा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी होणार धरणे आंदोलन.

🛑भाजप सरकारने थेट लाभार्थ्यांना पारदर्शकपणे लाभ दिला.- राजे समरजितसिंह घाटगे.
( गाव चलो अभियान अंतर्गत साधला लाभार्थ्यांशी संवाद.)
🛑आजरा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी होणार धरणे आंदोलन.

गडहिंग्लज प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विविध कल्याणकारी योजनांचा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शीपणे थेट लाभार्थ्यांना लाभ दिला.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. भाजपच्या ‘गाव चलो अभियान’अंतर्गत गडहिंग्लज शहरासह कडगाव व करंबळी येथे विविध ठिकाणी भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मदन देशपांडे,ज्योतिबा पाटील, प्रज्वल राजगुरू, वामन दूंडगे,बिलावर वसाहतीत महिला लाभार्थी संवाद साधला कडगाव येथे उद्योजक,माजी सैनिक ,शेतकरी बचत गटाच्या महिला तर करंबळी येथे बूथप्रमुख,नवमतदार व नागरिकांशी संवाद साधला.विविध ठिकाणी भिंतीवर कमळ चित्र रेखाटले. सचिन पाटील, अर्चना सुतार, स्वरूप मगदूम या गुणवंतांचा सत्कारही केला. श्री घाटगे पुढे म्हणाले, भाजप सरकारने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. सर्वच स्तरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे जागतिक पातळीवर देशाची मान उंचावली आहे. जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले, केंद्रात पंतप्रधान मोदी तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ग्रामीण भागात भाजपला चांगले वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समरजितसिंह घाटगे यांनी विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासह विकास कामांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे, शहराध्यक्ष सुदर्शन चव्हाण, शैलेश कावणेकर, रविंद्र घोरपडे, वामन बिलावर संग्रामसिंह घाटगे, विठ्ठल पाटील, संजय बटकडली, अजित जामदार, शहाजी पाटील, पी.आर.जाधव, प्रवीण माळी, अजित पाटील, बाळासाहेब शेरेकर,नंदकुमार येसादे आदी उपस्थित होते.

चौकट

हॕट्रिक मोदींच्या पंतप्रधानपदाची

गेल्या दहा वर्षाच्या काळातील दमदार कामगिरीच्या जोरावर
येत्या लोकसभेच्या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकून भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार आहे.तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची
हॅट्रिक करतील असा विश्वास श्री.घाटगे यांनी यावेळी व्यक्त केला.

🛑आजरा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी होणार धरणे आंदोलन.

आजरा.- प्रतिनिधी.

देश पातळीवरील कर्मचारी कृती समिती व शेतकरी संघर्ष समिती माध्यमातून देशाभरात एक दिवसाचे वेगवेगळ्या मागण्या साठी आंदोलन होत असल्याने, आजरा येथील सर्व श्रमिक संघटना,पेन्शनर, गिरणीकामगार व काजू उत्पादक शेतकरी याचे वतीने १) कंत्राटी, मानधनी, तात्पुरती या नेमणुका बंद करून, शासनाने कायम स्वरूपात रिक्त जागांवर ताबडतोब भरती करावी. २)कर्मचाराना किमान वेतन २६००० व किमान बोनस १०००० दिला पाहीजे. ३) सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या दिड पट हमी भाव मिळावा. ४) काजू बियांना २०० रूपये हमी भाव मिळावा ५) गिरणी कामगाराना मुंबई येथे मोफत घरे मिळाली पाहीजेत. ६) इ पी एफ ९५ च्या पेन्शनधारकांना किमान ९००० पेन्शन व महागाई भत्ता मिळाला पाहीजे या मागणी साठी शुक्रवार दिनांक १६फेब्रुवारी रोजी सकाळी आकरा वाजता तहसीलदार कार्यालय आजरा येथे सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार, पेन्शनर व शेतकरी यानी उपस्थित रहावे असे आवाहन काॅ शांताराम पाटील यांनी केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.