HomeUncategorizedआजरा साखर कारखान्यास बोगस चेक देणा-या आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा...

आजरा साखर कारखान्यास बोगस चेक देणा-या आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा व प्रत्येकी रु.५,०००/- दंड.🛑खळबळजनक घटना..महाप्रसादाला जाऊया म्हणत घेऊन गेले शेतात.- त्यानंतर तरुणीवर केला पाच जणांनी सामूहिक अत्याचार.

🛑आजरा साखर कारखान्यास बोगस चेक देणा-या आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा व प्रत्येकी रु.५,०००/- दंड.
🛑खळबळजनक घटना..
महाप्रसादाला जाऊया म्हणत घेऊन गेले शेतात.- त्यानंतर तरुणीवर केला पाच जणांनी सामूहिक अत्याचार.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्यास सन २०१८/१९ या गळीत हंगामात ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा पुरविणेसाठी घेतलेल्या अॅडव्हान्स रक्कमेतील थकीत रक्कमेच्या फेडीपोटी भुदरगड तालुक्यातील .सागर मुजता सुतार रा. टिक्केवाडी, हरीया ईश्वर माने रा. मडिलगे बु. सुभाष साताप्पा पाटील रा. कोनवडे सुनिल बापु पाटील रा. कोनवडे, पादूरंग विष्णू पाटील रा.मुदाळ, श्रीधर हरीया माने रामडिलगे बु. नामदेव कुंडलिक पोबार रा. पळशिवणे, रंगराम पांडूरंग आसने रा. टिक्केवाडी रविंद्र बापुसा। नेवने रा. आवळी, ता. राधानगरी या ७ आरोपींनी कारखान्यास सन २०१९ मध्ये थकीत रक्कम फेडण्यासाठी चेक दिले होते. सदरचे चेक न बटलेने त्यांचे विरुध्द प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आजरा येथे स्वतंत्ररित्या केसीस दाखल केल्या होत्या सदर केसरीस में न्यायालयासमोर चालून त्यावर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायमूर्ती मा. एस्. पी. जाधव. आजरा यांनी वरील आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा व प्रत्येकी रु.५,०००/- दंड तसेच त्यांनी कारखान्यास दिलेल्या चेक रक्कमे इतकी महणजेच सर्वाची मिळून रु.२८,७६,०००/- इतकी नुकसान भरपाई कारखान्यास देणेचा आदेश केला आहे फिर्यादी कारखान्याचेवतीने वकिल म्हणून अॅडची.के. देसाई यांनी काम पाहिले तर फिर्यादी म्हणून श्री. अनिल देसाई यांनी केसीस दाखल केल्या व राजकुमार कदम लिगल क्लार्क यांनी जाबजबाब दिले. सद्या महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यामध्ये तोडणी याहतुक कंत्राटदारांच्याकडून अॅडवान्स रक्कमा उमल करून कारखान्यास फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. अशी फसवणुक होवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाकडून देखील वेगवेगळे पर्याय अवलंबिले जात आहेत. महाराष्ट्रातील सर्रास कारखान्यामध्ये ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदारामार्फत फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अशातच आजरा साखर कारखान्याने दाखल केलेल्या केसीसमध्ये सर्व बाजुचा विचार करूम प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आजरा यांनी दिलेला निर्णय फसवणूक करणा-या कंत्राटदारावर वचक बसणे करीता महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांना व कंत्राटदारांना मार्गदर्शकच ठरणार आहे. कारखान्याचे पर्यायाने शेतक-यांचेही नुकसान टाळणेस या निर्णयाने मदत होणार आहे. आजरा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखान्याकडे थकबाकी असलेल्या व कारखान्यास चैक दिलेने मे.कोर्टात केसीस सुरू असलेल्या कंत्राटदारांना व्याजात सवलती देवून रक्कमा भरुण घेणेचे सवलतीचे धोरण अवलंबिले आहे. कारखान्याशी संपर्क साधून या धोरणाचा लाभ संबंधीत कंत्राटदारांनी घ्यावा व कायदेशिर कारवाई सारखे कटु प्रसंग टाळावेत असे अवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव पुरे यांनी केले आहे. यावेळी मा.व्हा. चेअरमन एम. के देसाई सर्व संचालक मंडळ सदस्य आणि प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही. के. ज्योती उपस्थित होते.

🟥खळबळजनक घटना..🛑महाप्रसादाला जाऊया म्हणत घेऊन गेले शेतात.- त्यानंतर तरुणीवर केला पाच जणांनी सामूहिक अत्याचार.

अमरावती :- प्रतिनिधी.‌

महाप्रसादाच्या निमित्ताने एका २३ वर्षीय तरुणीला तालुक्याच्या ठिकाणी आणले. मात्र, परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिला शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार केला.त्यावर पीडितेने विरोध करताच आरोपींनी तिला जबर मारहाण देखील केली. ही खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातील मालखेड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

🔴पाच जणांनी मिळून केला अत्याचार

या प्रकरणी महेश वाघमारे (वय 25), पिंटू हरले (वय 39), रमेश भलावी (वय 40), इस्माईल खाँ (वय 65), नितीन ठाकरे (वय 25) अशी या पाच संशयित आरोपींची नावे असून हे सर्व मालखेड येथील रहिवासी आहेत. यातील महेश वाघमारे हा पीडित तरुणीच्या कुटुंबीयांच्या परिचित आहे. त्यामुळे तो लाही (प्रसाद) करिता मालखेड येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून तो तिला मालखेड येथे घेऊन गेला. त्यानंतर त्याने पीडितेला रात्रभर आपल्या घरी ठेवले. 28 जानेवारीला तो तरुणीला तिच्या मूळगावी सोडून देण्यासाठी निघाला. महेशने तिला दुचाकीवर बसवले. मात्र, गावी न जाता त्याने गाडी शेताच्या दिशेने वळवली.
🛑दरम्यान, शेतात असलेल्या एका खोलीत तरुणीला नेण्यात आले. त्यानंतर पिंटू हरले हा देखील घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर या दोघांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. या दरम्यान तिथं रमेश भलावी, इस्माईल खाँ आणि नितीन ठाकरे हे देखील आले आणि त्यांनीही तिच्यावर अतिप्रसंग केला. यावर पीडितीने आरडो ओरड करून विरोध केला. मात्र, शेतशिवाऱ्याजवळ कुणीही नसल्याने काहीच उपयोग झाली नाही. पीडित तरुणीने स्वत: विरोध केला असता तेव्हा तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि याबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवानिशी मारू अशी धमकी देखील देण्यात आली.

🔴पाचही आरोपींना अटक

या थरारक घटनेनंतर पीडित तरुणीने कसेबसे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आणि त्यांनी लगेच शेंदूर जनाघाट पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस तक्रार दिली. या तक्रारीवरून 29 जानेवारीच्या रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत आरोपींचा शोध घेतला आणि काही तासांमध्येच पाचही आरोपींना अटक केले. या प्रकरणाचा सखोल तपास शेंदूर जनाघाट पोलीस करत आहेत. मात्र, या खळबळजनक घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.