🛑आजरा शहरातील रवळनाथ देवालयायाच्या नुतन बांधणीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजुर – आमदार प्रकाश आबिटकर 👇
🛑आजरा अर्बन बँक आजरा निवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा संपन्न.👇👇
आजरा. प्रतिनिधी,

आजरा शहरासह तालुक्यातील भावीकांचे श्रध्दास्थान असलेल्या ७०० वर्षापुर्वीच्या श्री रवळनाथ देवालयाच्या नुतन बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, श्री रवळनाथ ग्रामदैवत हे साधारण 700 वर्षापूर्वीचे असून आजरा शहराच्या मध्यवस्तीत वसलेले आहे. मंदिर पूर्वी लाकडी व दगडी स्वरूपाचे होते. मंदिरामध्ये मोठे तीन चौक टप्पे होते. या मंदिराचा १९८२ साली आजरा शहरातील नागरीकांनी जिर्णोध्दार केला. मंदिराच्या भोवताली अन्य मुख्य देवस्थाने असून भावेश्वरी, पालवेर, महादेव मंदिर, गणेश मंदिर असून शेजारीच मंदिर आहेत. या देवस्थानच्या यात्रा व रथोत्सवाला लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात. श्री रवळनाथाची मुख्य यात्रा होत असून १० दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. या मंदीरास अनेक वर्षे झाली असून या मंदीराचा जिर्णोध्दार करून त्याची नव्याने बांधणी करण्याची मागणी येथील नागरीकांच्या वतीने करण्यात येत होती. त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून मंदीर दगडी बांधणेसाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले आहे.
🛑आजरा अर्बन बँक आजरा निवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
सुवर्ण महोत्सव साजरा केलेली, १९६० साली स्थापन झालेली, अमृतमहोत्सवकडे करणारी, ग्रामीण भागातील शहर भागांनाही आपल्या कर्तृत्वाने लाजवणारी, भारत देशामध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवणारी व कोल्हापूर जिल्हयात आपला सहकाराचा टेंबा कार्याने गिरवणारी दि. आजरा अर्बन को. ऑप बँक लि. आजरा (मल्टीस्टेट) बँकेला वैभव मिळवून दिलेल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांनी आपल्या पत्नी समवेत आजरा येथील श्री. देसाई यांचे चाळोबा हिल्स या ठिकाणी एक दिवसीय स्नेहमेळावा आयोजित करुन एकमेकांशी भावनिक जिव्हाळा वाढविण्यासाठी व बँकेला अजूनही यशो शिखरावर पाहण्याची मनोकामना व्यक्त करुन एक दिवसीय मेळावा साजरा केला. यामध्ये ओळख व मनोगते, स्नेहभोजन, महिलांसाठी हळदी कुंकु, मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ज्या सेवकांनी आपली अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेल्या १) जयसिंगराव देसाई, २) महावीर त्रिभूवणे, ३) नबीलाल शेख, ४) शिवाजीराव सरदेसाई, ५) ग. ना. देसाई या सेवकांचा घरगुती सत्कार करणेत आला. या सेवकांने आपल्या मनोगतामध्ये आजरा बँकेचे संस्थापक संचालक व सध्याचे संचालक मंडळांबददल गौरवपूर्ण उद्गार काढले त्यांच्यामुळेच आमच्या संसार यशस्वी झाला असे सांगितले. त्याचबरोबर इतर सेवकांनी सुध्दा बँकेमुळे आमचा संसार व आमच्या मुलांचा संसार यशस्वीरीत्या पार पाडत असल्याबददल उद्गार काढून आजरा अर्बन बँकेच्या कायम ऋणात राहण्याची इच्छा प्रर्दशित केली. वेगवगळ्या ठिकाणचे सेवक त्यांच्या पत्नीसह एकत्र आल्यामुळे ४० ते ४५ वर्षानंतर एकत्र येण्याचा योग मिळाल्यामुळे सर्वच मंडळी भावनावश झाली होती. यानंतर मेळाव्यात महिलांचा हळदी कुंकु कार्यक्रम करताना महिला सुध्दा एकमेकीच्या मिठीमध्ये जात भावनांश झाल्या होत्या व त्यांच्या डोळयात आनंदाअश्रू चमकत होते. त्यामुळे कार्यक्रमाला वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त झाली होती. यावेळी दिवंगत सेवक व अधिकारी एकूण ४३ ईश्वरी मृतात्यास चिरशांती मिळावी यासाठी सर्वांनी २ मिनिटे स्तब्धता राहून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी गेले महिनाभर प्रयत्न सुरु होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रकाश देसाई, सूर्यकांत आजगेकर, बाळासो कुंभार, मारुती मोरे यांनी प्रयत्न केले.
