🛑राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या.- अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी. – राज्यातील 17 सनदी अधिकारी पहा..👇👇
🛑राज्यात लोकसभेच्या ४८ जागा काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपासाठी चर्चा. असे होणार जागावाटप.👇
मुंबई:- प्रतिनिधी.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महा राज्य शिक्षण,संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवरील अमोल येडगे कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🛑वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत
राहुल रेखावार कोल्हापूर जिल्हाधिकारी असताना अनेकवेळा चर्चेत राहिले.अंबाबाई मंदिरात पत्रकारांना प्रवेश रोखणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांकडून तत्काळ पदभार काढून घेणे आदी मुद्यांवरून चांगलेच चर्चेत राहिले. कोल्हापूर मनपाला प्रशासक मिळत नसताना त्यांनी काही मनपाची सुद्धा जबाबदारी पाहिली होती. भाजपकडूनही त्यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्यावर्षी महापूर येऊन नागरिकांना आपत्तीला तोंड द्यावा लागेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. त्यानंतर अनेकांचे स्थलांतर केले. त्यामुळे भीतीचं वातावरणही निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत राहिले.
17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
🔺1. नितीन पाटील (IAS:-MH:-2007) विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई यांची सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺2. अभय महाजन (IAS:-MH:-2007) सचिव, दिव्यांग कल्याण विभाग यांची विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺3. संजय एल. यादव (IAS:-MH:-2009) सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर, नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺4. राहुल रेखावार, (IAS:-MH:-2011) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺5. राजेंद्र क्षीरसागर (IAS:-MH:-2011) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरी जिल्हा, नियुक्ती करण्यात आली आहे.
- अमोल येडगे, (IAS-:MH:-2014) संचालक, महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांना जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
🔺7. श्री मनुज जिंदाल (IAS:-MH:-2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺8. भाग्यश्री विसपुते (IAS:-MH:-2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपट्टी संभाजी नगर
🔺९. अवश्यंत पांडा (IAS:-MH:-2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺10. वैभव वाघमारे (IAS:-MH:-2019) प्रकल्प अधिकारी, ITDP, अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺11. संजीता महापात्रा (IAS:-MH:-2020) प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺12. मंदार पत्की (IAS:-MH:-2020) प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
*🔺🔺13. मकरंद देशमुख (IAS:-MH:-2020) सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺14. नतिशा माथूर (IAS:-MH:-2020) संवर्ग गुजरातला महाराष्ट्रात बदलून प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून नियुक्त केले आहे.
🔺15. मानसी (IAS:-MH:-2021) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली.
🔺16. पुलकित सिंहIAS:-MH:-2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, चांदवड उपविभाग, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रकल्प अधिकारी, ITDP, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक
🔺17. करिश्मा नायर (IAS:-MH:-2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, बीड यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, जव्हार आणि सहायक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🛑राज्यात लोकसभेच्या ४८ जागा काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपासाठी चर्चा. असे होणार जागावाटप.👇
महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागेसाठी बैठकांवर बैठका होत आहेत. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपासाठी चर्चा सुरु आहे. बहुतेक जागांसाठीचा प्रश्न सुटला आहे. पण काही जागांसाठी अद्याप तिढा कायम आहे. तिन्ही पक्षांमध्ये कोणती जागा कोणत्या पक्षाकडे जाईल आणि कोणत्या जागेसाठी अद्याप चर्चा सुरु आहे हे आपण पाहुया..
तिन्ही पक्षांमधील जागावाटप
काँग्रेस– १४
शिवसेना ठाकरे गट– १७ ( शिवसेना ठाकरे गट १५ + वंचित बहुजन आघाडी १ + स्वाभिमानी पक्ष १)
राष्ट्रवादी काँग्रेस — ९

जागेवर तिढा कायम – ८
कुठल्या जागा कुठल्या पक्षाकडे असणार आणि तिढा कुठल्या जागांवर
१)रामटेक -तिढा कायम
२ )बुलढाणा – शिवसेना ठाकरे गट
३) यवतमाळ वाशीम -शिवसेना ठाकरे गट
४)हिंगोली – तिढा कायम
५) परभणी -शिवसेना ठाकरे गट
६) जालना -तिढा कायम
७) संभाजीनगर -शिवसेना ठाकरे गट
८) नाशिक -शिवसेना ठाकरे गट
९)पालघर -शिवसेना ठाकरे गट
१०) कल्याण – शिवसेना ठाकरे गट
११) ठाणे – शिवसेना ठाकरे गट
१२) मुंबई उत्तर पश्चिम -तिढा कायम
१३)मुंबई दक्षिण -शिवसेना ठाकरे गट
१४) मुंबई ईशान्य -शिवसेना ठाकरे गट
१५) मुंबई दक्षिण मध्य – तिढा कायम
१६) रायगड -शिवसेना ठाकरे गट
१७)रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसना ठाकरे गट
१८) मावळ -शिवसेना ठाकरे गट
१९) शिर्डी – तिढा कायम
२०) धाराशिव -शिवसेना ठाकरे गट
२१) कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गट
२२) हातकणंगले – ( स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात
२३) अकोला – (वंचित बहुजन आघाडी साठी सोडणार
२४) शिरूर – राष्ट्रवादी
२५) सातारा -राष्ट्रवादी
२६) माढा- राष्ट्रवादी
२७) बारामती -राष्ट्रवादी
२८) जळगाव -राष्ट्रवादी
२९)रावेर -राष्ट्रवादी
३०)दिंडोरी -राष्ट्रवादी
३१) बीड -राष्ट्रवादी
३२) अहमदनगर -राष्ट्रवादी
३३) अमरावती -काँग्रेस
३४) भंडारा – तिढा कायम
३५) चंद्रपूर -काँग्रेस
३६) गडचिरोली – काँग्रेस
३७) नांदेड -काँग्रेस
३८) लातूर -काँग्रेस
३९) धुळे -काँग्रेस
४०) नंदुरबार -काँग्रेस
४१)पुणे -काँग्रेस
४२) सोलापूर – काँग्रेस
४३)सांगली -काँग्रेस
४४) मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस
४५) मुंबई उत्तर -काँग्रेस
४६)भिवंडी -तिढा कायम
४७) वर्धा- काँग्रेस
४८) नागपूर -काँग्रेस
