🛑बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करणार – मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती ( मुगळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ.)
🛑आजरा कारखान्याची दि.१६/१२ ते ३१/१२/२०२३ अखेरची ऊस बिले जमा.- चेअरमन धुरे.
🛑मौजे बेळगुंदी ता. गडहिंग्लज येथे ४० वर्षापूर्वी पासूनच्या जटांचे केले न
प्रतिनिधी.- सेनापती कापशी.

बांधकाम कामगार महामंडळामध्ये आज रोजी १५ हजार कोटीहून अधिक रुपयांचा निधी जमा झाला आहे. त्यांच्यासाठी विविध योजना शासन राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच बांधकाम कामगारांना २३ भांड्याचा संच वाटप करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मुगळी ता. कागल येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मी प्रत्येक गावांमध्ये विकास कामे केली आहेत. त्याच गावची आकडेवारी जाहीर करतो. संपूर्ण विकास कामांची आकडेवारी जाहीर केली, तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. इतका प्रचंड निधी मी माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत म्हणाले, ‘आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ हे एक आगळे वेगळे नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला कायमपणे पाठबळ देणारा हा नेता आहे. म्हणूनच हे नेतृत्व असेच जोपासले पाहिजे.’ यावेळी उपसरपंच उदयबाबा पसारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत आनंदा पाटील यांनी केले. प्रास्ताविक माजी उपसरपंच बाबासाहेब सांगले यांनी केले. यावेळी माजी सरपंच पांडुरंग पसारे, कृष्णात गुरव, निवृत्ती पाटील, जयसिंग पाटील, मुकुंद पाटील, परशुराम शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑आजरा कारखान्याची दि.१६/१२ ते ३१/१२/२०२३ अखेरची ऊस बिले जमा.- चेअरमन धुरे
आजरा. प्रतिनिधी

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आजरोजी दोन लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले. कारखान्याकडे दि.१६/१२/२०२३ ते ३१/१२/२०२३ अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले विनाकपात ऊस पुरवठा शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.
हंगाम २०२३/२४ मध्ये करखान्याने ३.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असुन त्याकरीता बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणा ऊस तोडणी करीता कार्यरत ठेवणेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष मा.ना. हसन मुश्रीफसाहेब, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपूर्ण ऊसाची बिले विनाकपात एकरक्कमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील नियमितपणे आदा केली जाणार आहेत.
कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन नवनिर्वाचीत व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणुन ऊस उत्पादकांना दिलासा दिला जाणार आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेला ऊस वेळेत गाळपास आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. सद्या कार्यक्षेत्रातील हत्ती, गवे इत्यादी जंगली प्राण्यांनी नासधूस केलेल्या ऊसाचे तोडणीस प्राधान्य दिले जात असलेने उपलब्ध तोडणी वाहतुक यंत्रणा विखुरलेली आहे. सदर बाधीत क्षेत्र आटोक्यात येताच ज्या गावात यंत्रणा नाही किंवा अपुरी आहे तेथे प्राधान्याने यंत्रणा लावुन ऊस उचल करीत आहोत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखानचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही.के.ज्योती व अधिकारी उपस्थित होते.
🛑मौजे बेळगुंदी ता. गडहिंग्लज येथे ४० वर्षापूर्वी पासूनच्या जटांचे केले निर्मूलन.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

मौजे बेळगुंदी ता. गडहिंग्लज
येथे ७० वर्षीय श्रीमती शांता लक्ष्मण लोहार यांच्या
४० वर्षापूर्वी पासूनच्या जटांचे केले निर्मूलन. ओझ्याने चालणे मुस्कील झाले होते. जटांचे ओझे न पेलल्या ने त्या जखमी झालेल्या जटामुक्ती मुळे डोक्यावरील ओझे कमी झाले, आणि भार कमी झाल्याने हिंडु फीरू लागल्या. बेळगुंदी सरपंच मा शामला सनवक्के यांनी परीवर्तन करून डॉ सुदाम हरेर यांच्या सहकार्याने अंनिस चे कार्यकर्ते पांडुरंग करंबळकर गुरूजी, संजय घाटगे, शिवाजी भगुत्रे, तानाजी कुरळे, निनाद बुगडे,व त्या माऊली चे मुलगा, सून, नात उपस्थित होते.
दर्शन मुक्त गळा, पडल्या मुक्त देवारा. आशा पद्धतीने जिल्ह्यातील पहिलाच अंधश्रद्धा मुक्त कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच यांच्या हस्ते साडी, चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
