आजरा अर्बन बँकेच्या वतीने व्हाट्सअप बँकिंग सह विविध सुविधांचा शुभारंभ.
आजरा.- प्रतिनिधी.
नवनाट्य कला मंच आजरा आयोजित आणि दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि, आजरा (मल्टी-स्टेट) प्रायोजित च्या वतीने ग. दि. माडगुळकर व सुधीर फडके यांनी अजरामर केलेली गाणी श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्ताने गीत रामायणाचे आयोजन आजरा महाविद्यालय आजरा चे प्रांगणात केले होते. गीतकार श्रीधर सुधीर फडके व त्यांचे सहकारी यांनी गीत रामायणाचे सादरीकरण केले असून सदर कार्यक्रमाचे निवेदन सुकन्या जोशी यांनी केले. सदर कार्यक्रमाला आजरा व पंचक्रोशीतील जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बँकेचे व्हाट्सअप बँकिंग व विविध सुविधांचे उदघाटन गीतकार श्रीधर सुधीर फडके यांचे हस्ते करणेत आले. व्हाट्सअप बँकिंग च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे स्टेटमेंट पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच Frictionless Customer Onboarding च्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्राशिवाय सेव्हिंग व चालू खाते उघडता येईल. भविष्यात याच सुविधेवरून बँकेतील ग्राहकांना मोबाईल वरुन खाते उघडणेची सोय करणेचा बँकेचा मानस आहे. भविष्यात जेष्ठ नागरिकांना घरबसल्या रक्कम देणेची सुविधा याच सिस्टीमवरुन करता येणार आहे. सदर कार्यक्रमाला अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख व बँकेचे संचालक अशोक चराटी, बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकर, व्हा. चेअरमन सुनील मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर , श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजलसो, मनोहर कावेरी, जयवंत खराडे तसेच अण्णा भाऊ संस्था समूहाचे सर्व पदाधिकारी आजरा शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले तर आभार बँकेचे चेअरमन श्री. कुरुणकर यांनी मानले.
