🛑 सिंधुदुर्गातील वेंगुर्ले व सावंतवाडीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास एका महिला उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे योगदान.
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
वेंगुर्ले व सावंतवाडी शहरातील काही युवक व युवतीने आपल्या मोबाईलच्या स्टेट्समध्ये व सोशल मीडियावर औरंगजेबाचा फोटो ठेवला व काही ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट टाकून हिंदुच्या धार्मिक भावनांना हात घालून दोन धर्मात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करून दोन्ही शहरातील वातावरण संतप्त ठेवणाऱ्या संशयित युवक युवतींना गजाआड केले.तसेच संतप्त झालेल्या जमावाला शांत करण्याचे काम एका महिला उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हा जमाव शांत करण्यात आला.
🔴वेंगुर्ले शहरात एका व्यक्तीने आपल्या स्टेट्सला औरंगजेबाचा स्टेट्स ठेवल्याने २३ जानेवारी रोजी संध्याकाळपासून ते रात्री वेंगुर्लेतील हिंदु संतप्त झालेले होते.वेंगुर्लेमध्ये तर जय श्रीरामाच्या घोषणा देत,जय शिवाजी,जय भवानी अशा घोषणा देत हजारो हिंदु धर्मिय एकवटत होते.रात्रौ उशिरापर्यंत या कृत्याचा निषेध करण्यासाठी जमा होत असताना वेंगुर्ले पोलीसांकडून सर्वाना शांततेचे आवाहन करण्यात येत होते.मात्र कुणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.या गुन्ह्य़ातील मुख्य सूत्रधारावर जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही.तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचे सांगून जमाव अधिकच संतप्त होत होता.वेंगुर्ले पोलीसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचार्यांनी जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले.तसेच संबंधिताला गजाआड करण्याचे काम पोलीस अधिक्षकारी संध्या गावडे यांनी केले.
🛑वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची बदली झाल्यानंतर ही जागा रिक्त असतानाही या घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन आपल्याकडे असलेल्या पोलीस फौज फाटयाचा यथोचित वापर करून हा जमाव शांत केला.एक महिला पोलीस अधिकारी असूनही शांत डोकं ठेवून योग्य नियोजन करून संतप्त जमावावर नियंत्रण मिळविले व वेंगुर्ले शहरात शांतता स्थापित केली.त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे व त्यांच्या पोलीस टिमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सावंतवाडी शहरातही त्याच दिवशी तशीच परिस्थिती निर्माण झाली होती.संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे असलेली पोलीस कुमक पुर्णता वापरून हिंदु धार्मिक भावना दुखविणाऱ्या व जातीय तेढ निर्माण करण्याऱ्या संशयितांच्या मुसक्या तात्काळ आवळून त्यांना गजाआड तर केलेच. शिवाय सावंतवाडी शहरात या उफाळलेला जमाव शांत करण्याचे काम उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांनी करून सावंतवाडीवाशियांची मने जिंकली. दरम्यान वेंगुर्ले व सावंतवाडी या दोन्ही प्रकरणात तसं पाहिल्यास योग्य वेळी योग्य नियंत्रण ठेवून प्रकरण हाताळलं गेलं नसल्यास दोन्ही समाजात धार्मिक भावना भडकून दंगल,जाळपोळ तोडफोड अशा मोठ्या घटना घडू शकल्या असत्या.मात्र योग्य नियोजनामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांनी हा जमाव नियंत्रणात आणला व शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले.या त्यांच्या धाडसाचे सावंतवाडी तालुक्यातूनही कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक महिला उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे या सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यात कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्याचे काम त्या करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातही त्यांनी यशस्वी काम केले.तसेच त्यांच्यात कार्यक्षेत्रात नुकत्याच घडलेल्या या दोन धार्मिक तेढ करणाऱ्या या दोन्ही घटनेचा उद्रेक यशस्वीपणे हाताळण्यात पोलीस अधिकारी संध्या गावडे यांचा मोठा वाटा आहे.अशा या महिला उपविभागीय पोलिस अधिक्षकाऱ्याला कोकणचा तडाखा न्यूजचा सलाम..
