🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडे ऊस वाहतुक करणा-या वाहनांना रिफ्लेक्टर सक्ती.
🛑वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत आजरा साखर.- कारखान्याचे वजन काटे निर्दोष.
आजरा.- प्रतिनिधी.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. २१ रोजी कारखान्याकडे ऊस वाहतुक करणा-या वाहन मालक व चालक यांची कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी मोटर वाहन निरिक्षक सागर चौगुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, वाहतुक नियमांची सविस्तर माहीती दिली. यामध्ये प्रामुख्याने वाहन चालकांनी वाहन चालवितांना टेपरेकॉर्डर लावू नये. त्याच बरोबर मोबाईलचा वापरही करू नये. सद्या महामार्गाचे काम चालु असलेने इतर वाहनांची काळजी घेवून, वाहन चालवावीत व अपद्यात टाळावेत अश्या सुचना दिल्या. तसेच सर्व वाहनांना रिफ्लेक्टर लावणेची सुचना करून रिफ्लेक्टर लावणेत आले. यावेळी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, शेती ऑफिस हेड क्लार्क संदिप कांबळे, केनयार्ड स्टाफ त्याच प्रमाणे ट्रक, टॅक्टर मालक व चालक मोठया संखेने उपस्थित होते.
वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत आजरा साखर.- कारखान्याचे वजन काटे निर्दोष.
आजरा – प्रतिनिधी.
आजरा साखर कारखान्याचे वजन काटे वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत निर्दोष झाले आहेत.
दि २२रोजी रोजी मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे आदेशाने मा. निरीक्षक वैद्यमापन शास्त्र व इतर अधिकारी यांचे भरारी पथकाने आजरा साखर कारखान्याचे दोन्ही ऊस वजन काटयाची तपासणी करण्यासाठी दुपारी अचानक भेट दिली व दोन्ही वजन काट्यांची संपुर्ण पडताळणी केली. त्यांनी तपासणी कामी ट्रक व ट्रॅक्टर अशा पुर्वी वजन केलेल्या व नविन वाहनांची वजने घेतली. तसेच 8 टनाची वजने प्रत्यक्षात ठेवून पडताळणी केली त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. त्यामुळे आजरा साखर कारखान्याचे ऊस, साखर व उपपदार्थ वजन करणारे सर्व काटे बिनचूक व निर्दोष असलेचे स्पष्ट झाले. काटे बिनचूक असलेचा अहवाल भरारी पथक अधिकारी यांनी कारखान्यास सादर केला. आजरा साखर कारखाना हा गडहिंग्लज उप विभागातील सहकारी साखर कारखाना असून, या कारखान्याच्या वजन काटयाबाबत ऊस पुरवठादार शेतक-यांमध्ये नेहमीच विश्वासार्हता आहे. सदर तपासणीमुळे ती विश्वासार्हता पुन्हा वृध्दींगत झाली आहे.
भरारी पथकाचे अधिकारी श्री.एम.व्ही.देसाई, निवासी नायब तहसिलदार, आजरा, श्री.के.डी. ढेरे, पोलिस प्रतिनिधी, श्री.एल.जी.आकुलवार, तृतीय विशेष लेखापरिक्षक प्रतिनिधी व श्री. अविनाश शिगांडी निरीक्षक वैदयमापन शास्त्र गडहिंग्लज यांनी काटयांची तपासणी केली. त्यावेळी प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेंजर (प्रोडक्शन) श्री.एस, के. सावंत ऊस पुरवठादार शेतकरी, केनयार्डचे कर्मचारी, सर्व वाहन मालक व चालक प्रत्यक्ष उपस्थित होते
