हरपवडेपैकी धनगरवस्तीवर सोन्याचा दिवस.- स्वातंत्र्यानंतर ७५ व्या प्रजासत्ताक दिनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. ( आम. आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील व आजरा भुदरगड – राधानगरी मतसंघातील हरपवडेपैकी धनगरवस्तीवर सोन्याचा दिवस मानला आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ व्या प्रजासत्ताक दिनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अर्थात स्वातंत्र्यानंतर पहील्यादाच हरपवडे येथील धनगरवस्तीला जोडणाऱ्या रस्त्याचे काम दि २६ रोजी चालू झाले आहे. “१५ आँगस्टला लाईट जोडली” व आज “२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी रस्त्याच्या कामाला सुरवात झाली याकामी
” आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर” यांच्या अथक प्रयत्नातून व ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे आज हरपवडेपैकी धनगरवस्तीवर अखेर सोन्याचा दिवस उगवला नावलकरवाडी ते धनगरवस्ती या रस्त्याचे काम चालू झाल्याने धनगर वस्तीवरील ग्रामस्थामध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. ज्या ज्या लोकानी कळत-नकळत सहकार्य केले अशा लोकांचे मनापासुन आभार धनगर समाजाने मानले.
