मागील वर्षभरातील नळ पाणीपुरवठा योजनेचे बिघडलेले. नियोजन लावा अन्यथा.- आजरा नगरपंचायतीवर पाणी मोर्चा काढण्याचा शहरवासीयांचा इशारा.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहरातील मागील एक वर्षभर नळ पाणीपुरवठा योजनेचे नियोजन बिघडले असून यामुळे शहरवासीयांचे पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. तर या पार्श्वभूमीवर ३० जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा प्रश्नाची सोडवणूक नाही झाल्यास ३१ जानेवारी रोजी आजरा नगरपंचायतीवर पाणी मोर्चा काढण्याचा इशारा आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीमार्फत देण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेचे नियोजन बिघडल्याने शहरातील महिला वर्गाची प्रचंड हाल होत आहेत प्रसंगी खाजगी पाण्याची टँकर विकत घ्यावे लागत आहेत यामुळे शहरवासीयांना आर्थिक भर दंड बसत असून त्याला सर्वस्वी नगरपंचायत जबाबदार आहे नगरपंचायतीने तातडीने पाणीपुरवठा नियोजन मार्गावर आणून दररोज पाणीपुरवठा न केल्यास ३१ जानेवारी रोजी सदर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे याबाबतचे लेखी निवेदन नगरपंचायत अधिकाऱ्यांना देऊन चर्चाही केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष सुधीर कुंभार, पांडुरंग सावरकर, विजय थोरवत, दयानंद भोपळे,
अतुल पाटील, गौरव देशपांडे, गुरु गोवेकर, मारियान डिसोजा यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
