आल्याच्यावाडीत पिसाळलेल्या माकडा कडून आठ जणांना चावा.- नागरिक लहान मुले भयभीत. ( पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करा.- अन्यथा वन विभागासमोर निदर्शने करणार माजी उपसरपंच देवराज माडभगत. )
आजरा – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील आल्याच्यावाडीत पिसाळलेल्या माकडा कडून लहान मुलांसह नागरिकांना चावा घेत आठ जणांना जखमी केल्याचे समजते.
यापूर्वी देखील या ठिकाणी असे प्रकार घडले आहेत याबाबत तक्रार करून देखील वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
आज दि.२४ रोजी या गावातील माडभगत व मुळीक या कुटुंबातील नागरिकांना ओरबाडून, चावा घेऊन जखमी केले. काही नागरिकांना लहान मुलांना घरात जाऊन माकडाने चावा घेतला आहे. यामध्ये लहान मुलांचा सहभाग आहे. वन विभागाचे कर्मचारी जाऊन पाहणी करतात पण त्या माकडावर उसकलने किंवा बेशुद्ध करून दूर जंगलात सोडण्याचे काम वन विभागाचे होते. पण ही जबाबदारी घेऊन वन विभागाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे येथील नागरिकांचे मत आहे .याबाबत येणाऱ्या दोन दिवसात संबंधित माकडाचा बंदोबस्त नाही केल्यास. वनविभागासमोर येऊन निदर्शने करणार असल्याचे माजी उपसरपंच देवराज माडभगत यांनी बोलताना सांगितले आहे.
