रवळनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक शिंपी – उपाध्यक्ष समीर गुंजाटी.
आजरा : प्रतिनिधी.
आजरा येथील श्री. रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक शिंपी यांची तर उपाध्यक्षपदी समीर गुंजाटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल पाटील होते. श्री. रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदासाठी शिंपी यांचे नाव संचालक विलास कुंभार यांनी सुचविले त्यास संचालक इब्राहीम इंचनाळकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी गुंजाटी यांचे नाव मजीद मुराद यांनी सुचविले त्यास संचालक किरण कांबळे यांनी अनुमोदन दिले. यावेळी नुतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर अध्यक्ष श्री.शिंपी बोलताना म्हणाले भागधारक, ग्राहक, ठेवीदार यांच्या हिताची जपणूक होईल अशा दृष्टीचे धोरण आखून संस्थेचा कारभार केला जाईल असे स्पष्ट केले. याकरिता संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
निवड सभेला संचालक युसूफ आदम गवसेकर, विश्वास कृष्णा जाधव, विक्रम अर्जुन पटेकर, माधुरी अशोक पाचवडेकर, अर्चना संतोष मराठे, सुधीर नार्वेकर यांच्यासह सचिन शिंपी, अशोक पोवार आदी उपस्थित होते. स्वागत व आभार संस्थेचे मॅनेंजर विश्वास हरेर यांनी मानले.
