“एक मराठा कोटी मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस.- आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन पुणेकरांना केली मेजवानी.
पुणे.- प्रतिनिधी.

नगर रोडवरील रांजणगाव येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील महागणपतीची आरती करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या वेळी परिसरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय… हर हर महादेव… एक मराठा, लाख मराठा.. अशा घोषणा देऊन भगवे झेंडे, भगव्या टोप्या घातलेले मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व मराठा गीतावर तरुणांनी धरला ताल घोषणाची अतिचबाजी व भगव्या झेंड्यांचा टोप्या घालून नाच.. पुणेकरांनी दिला पाठिंबा.
फुलांची उधळण व एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी पुणे-नगर रोडवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चाचा आवाज दुमदुमून गेला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जरांगे-पाटील यांच्यासह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते.
गावागावातून चपाती, शेंगदाणा चटणी
पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली. खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साडेतीन हजार चपात्या, पन्नास किलो शेंगदाण्याची चटणी, ५० किलो लसणाची चटणी यांचे वाटप मराठा बांधवांना करण्यात आले. रांजणगाव गणपती-कारेगाव परिसरातील सर्व गावांत चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती. सोमवारी दुपारपर्यंत प्रत्येक गावात महिलांमध्ये स्वयंपाकाची लगबग सुरू होती. काही गावांतून लापशी, डाळ-भात सुद्धा विसाव्याच्या ठिकाणी पोहोचविण्यातआला होता.

