संविधान सन्मान परिषद – मुक्ती संघर्ष समितीशोध संत रविदासांचा या ग्रंथावर गडहिंग्लज मध्ये होणार रविवारी चर्चासत्र.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
गडहिंग्लज येथे संविधान सन्मान परिषद व मुक्ती संघर्ष समितीशोध संत रविदासांचा या ग्रंथावर चर्चासत्र होणार असल्याची माहिती. मुख्य संघटक संग्राम सावंत यांनी दिली. या चर्चासत्राचे अध्यक्ष- डॉ. भारत पाटणकर ज्येष्ठ विचारवंत व अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल हे असणार आहेत. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
संविधान सन्मान परिषद व मुक्ती संघर्ष समिती आयोजित परिवर्तनवादी कवी, लेखक, अभ्यासक व कार्यकर्ते डॉ.रवींद्र श्रावस्ती लिखित शोध संत रविदासांचा या संशोधनपर ग्रंथावर संवाद – परीक्षण-समीक्षा चर्चासत्र आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रात सहभाग डॉ. बाबुराव गुरव ( ज्येष्ठ विचारवंत व लेखक) सुरेश पोवार ( विश्लेषक व अभ्यासक ) प्रा. पी. डी. पाटील (परिवर्तनवादी कार्यकर्ते व अभ्यासक) हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमातचा समारोप पुस्तकाचे लेखक डॉ. रवींद्र श्रावस्ती सांगली हे करणार आहेत. तसेच राजवैभव शोभा रामचंद्र; राज्य सचिव, संविधान संवाद समिती यांचा सत्कार ठेवलेला आहे. या कार्यक्रमातची भूमिका मांडणी संग्राम सावंत मुख्य संघटक, संविधान सन्मान परिषद हे मांडणार आहेत.
रवि २८ जानेवारी २०२४ रोजी स. १० वा. हा कार्यक्रम गडहिंग्लज तालुका माध्यमिक शिक्षक सेवकांची सह.पतसंस्था, डॉ. कॉलनी गडहिंग्लज याठिकाणी होणार आहे. तरी या कार्यक्रमाला जनतेने उपस्थित राहावे.असे आवाहन मुक्ती संघर्ष समिती व संविधान सन्मान परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजक सुरेश खोत दिंगबर विटेकरी समीर खेडेकर, मजीद मुल्ला,विनायक कांबळे,राहुल दास, विनित भोसले,संजय कांबळे,अक्षय कांबळे असे आहेत.
