HomeUncategorizedआजरा साखर कारखान्यात २,०५,००० व्या साखर पोत्यांचे पूजन व वसंतराव देसाई आजरा...

आजरा साखर कारखान्यात २,०५,००० व्या साखर पोत्यांचे पूजन व वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना नामकरण फलकाचे अनावरण.

आजरा साखर कारखान्यात २,०५,००० व्या साखर पोत्यांचे पूजन व वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना नामकरण फलकाचे अनावरण.

आजरा – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्यात चालू गळीत हंगाम २०२३/२४ मध्ये उत्पादीत झालेल्या 2 लाख साखर पोत्यांचे पूजन व वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.अमृतनगर गवसे या नामकरण फलकाचे अनावरण कारखान्याचे मा. चेअरमन श्री. वसंतराव बापुसोो धुरे यांचे शुभहस्ते व सर्व संचालकांचे उपस्थित आजरोजी संपन्न झाला.
आजरा साखर कारखान्यात या गळीत हंगामात ७० दिवसांत १७६१४० मे.टन ऊसाचे गाळप करून २,०५,००० मे.टन साखरेचे उत्पादन झाले असुन सरासरी ११.६३ टक्के इतका साखर ऊतारा प्राप्त झालेला आहे. यावेळी चेअरमन वसंतराव बापुसोा धुरे यांनी कारखान्याचे गाळप नियोजना प्रमाणे व्यवस्थित करण्यासाठी नुतन संचालक मंडळ प्रयत्नशिल असुन या गळीत हंगामात किमान ३ लाख ५० हजार मे.टन गाळप करणेसाठी योग्य नियोजन संचालक मंडळाने केले आहे. तसेच इतर कारखान्यांचे बरोबरीने होणारी ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वेळच्यावेळी पाठविणेत येत आहे. तसेच तोडणी वाहतुक यंत्रणेची बिलेही देणेत येत आहेत. येथुन पुढेही येणा-या ऊसाची व तोडणी वाहतुकीची बिले वेळेत आदा करणेचे नियोजन संचालक मंडळाने ना. हसन मुश्रीफ, पालकमंत्री कोल्हापूर यांचे मार्गदर्शना नुसार कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने केले आहे. तरी ऊस उत्पादकांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आजरा कारखान्याकडे गळीतास पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन केले. या संयुक्त कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, कोल्हापुर जिल्हा बँकेचे संचालक तथा कारखान्याचे बँक प्रतिनिधी सुधीर देसाई कारखान्याचे संचालक, मुकुंदराव देसाई, उदयसिंह पोवार, अनिल फडके, रणजीत देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, राजेंद्र मुरूकटे, गोविंद पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण तसेच कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेंजर (टेक्नी) व्ही.एच. गुजर, प्रोडक्शन मॅनेंजर श्री.एस.के. सावंत, आदी खातेप्रमुख, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.