HomeUncategorizedमहालक्ष्मी यात्रेनिमित्त एकनिष्ठ युवा मंच मडिलगे आयोजित कबड्डी स्पर्धत -मावळा सोडली संघाचा...

महालक्ष्मी यात्रेनिमित्त एकनिष्ठ युवा मंच मडिलगे आयोजित कबड्डी स्पर्धत -मावळा सोडली संघाचा प्रथम क्रमांक. (स्पर्धक व प्रेक्षकांच्या सावलीसाठी भव्य मंडपाच्या आयोजनाचे ग्रामस्थांकडून कौतुक. )

महालक्ष्मी यात्रेनिमित्त एकनिष्ठ युवा मंच मडिलगे आयोजित कबड्डी स्पर्धत –
मावळा सोडली संघाचा प्रथम क्रमांक. (स्पर्धक व प्रेक्षकांच्या सावलीसाठी भव्य मंडपाच्या आयोजनाचे ग्रामस्थांकडून कौतुक. )

आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा महालक्ष्मी यात्रेनिमित्त एकनिष्ठ युवा मंच आयोजित भव्य कबड्डी स्पर्धत
मावळा सोडली संघाचा प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापूर जिल्हा कबड्डी, असोसिएशनच्या मान्यतेने १९ व २० जानेवारी २०२४ रोजी ६० किलो वजनी गटातील निमंत्रीत पुरूषांच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यामधील भव्य बक्षीसे प्रथम क्रमांक- व आकर्षक चषक २१,००१ रूप्रवेश, द्वितीय क्रमांक व आकर्षक चषक १५,००१ रू/- तृतीय क्रमांक व आकर्षक चषक ११,००१ रू/- चतुर्थ क्रमांक व आकर्षक चषक ७,००१ रू/-उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड उत्कृष्ट खेळाडू आकर्षक भेटवस्तू आकर्षक भेटवस्तू अशी बक्षिसे होती. या कबड्डी स्पर्धेत क्रमशः क्रमांक १) मावळा सोडली २१००० २) शिवमुद्रा कौलव १५००० ३) शिवप्रेमी शिरोली १०००० ४) शाहू सोडली ७००० असे अनुक्रमे क्रमांक पटकावले. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिक जाधव व बक्षीसदाते यांच्या शुभहस्ते करण्यात आले
तसेच सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच सुशांत गुरव, सर्व ग्रा. पंचायत सदस्य, तसेच कारखाना संचालक दीपक देसाई, माजी सभापती भिकाजी गुरव, के. व्ही. येसने, जनार्धन निऊगरे, महादेव कातकर, शिवाजी गुरव, केरबा पाटील, देवस्थान समिती अध्यक्ष विश्वजीत मुंज, सर्व सदस्य, विविध संस्थेचे चेअरमन व्हा. चेअरमन संचालक. मंडळाचे अध्यक्ष सदस्य, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांचे सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. या कबड्डी स्पर्धेतील प्रमुख भूमिका व योग्य निर्णय घेणारे पंच म्हणून
ओंकार खवरे, संभाजी गावडे, जीवन निकम, अनिल गावडे यांचे स्पर्धा संपेपर्यंत मोलाचे सहकारी लाभले. सालाबाद प्रमाणे कबड्डी स्पर्धेचे सूत्रसंचालन व कॉमेट्री विजय परुळेकर सर यांनी केले.
सामने संपल्यानंतर विजय संघांना बक्षीस व पारितोषिक वितरण समारंभ मान्यवर व बक्षीसदाते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कबड्डी स्पर्धेसाठी एकनिष्ठ युवा मंच मडीलगे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदेश देसाई, अध्यक्ष सचिन कातकर, उपाध्यक्ष अमित देसाई, खजिनदार सुरज सुतार, तसेच प्रथमेश देसाई प्रकाश दुरगुडे, प्रतीक मोहिते, विश्वास कातकर, सुरज हारळकर, सुरज सुतार, रोहित पोवार, विनायक निऊगरे, दयानंद देसाई, ओमकार सुतार,
ओमकार हारळकर, तेजस हाटवळ सह ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष श्री कातकर यांनी सर्वानी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

चौकट.

प्रेक्षक व खेळाडूंना खेळाचा आनंद मिळावा.- भव्य दिव्य मंडपाच्या आयोजनाचे कौतुक.

मडिलगे. ता. आजरा येथे मागील अनेक वर्षापासून नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात येथील महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते. या यात्रेनिमित्त भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. शिवप्रतिष्ठान मडिलगे यांनी हा कबड्डी स्पर्धेचा पाडलेला पायंडा अखंडपणे मडिलगे येथील तरुण मंडळांनी चालू ठेवला आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळे मंडळ या स्पर्धेचे आयोजन करून चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडतात व यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभते. २०२४ सालातील एकनिष्ठ युवा मंच मंडळ आयोजित स्पर्धेचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच नव्याने स्पर्धक खेळाडूंना उन्हाच्या जळीपासून मुक्त करत मोठ्या मंडपाचे आयोजन केल्यामुळे प्रेक्षकांना समाधानकारक खेळाचा आनंद घेताना तर खेळाडूंना फक्त खेळावर लक्ष केंद्रित करून सावलीमध्ये खेळ दाखवण्याचा आनंद मिळाला. त्यामुळे स्पर्धक व ग्रामस्थांकडून एकनिष्ठ युवा मंच या मंडळाचे कौतुक करण्यात आले.

Previous article
Next article
पहा देशातील राज्यातील दिवसभराच्या घडामोडी आज उद्या व परवा काय होणार देशात राज्यात मराठा आरक्षण व राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा…🚩👇 🔴मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीसांच्या सुट्ट्या रद्द.🟥आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार.- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय.🛑मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त.- १ हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात🟥मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत. तर उद्धव ठाकरे यांना टपालाने आमंत्रण.🟥 अयोध्या नगरी सजली.-उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.