HomeUncategorizedकाजू उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक.- २०० रु दर मिळालाच पाहिजे.- कॉ. सुभाष काकुस्ते.(श्रमिक...

काजू उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक.- २०० रु दर मिळालाच पाहिजे.- कॉ. सुभाष काकुस्ते.(श्रमिक शेतकरी संघटनेची मागणी आजरा येथे भव्य परिषद संपन्न.)

काजू उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक.- २०० रु दर मिळालाच पाहिजे.- कॉ. सुभाष काकुस्ते.
(श्रमिक शेतकरी संघटनेची मागणी आजरा येथे भव्य परिषद संपन्न.)

आजरा.- प्रतिनिधी.

काजू उत्पादक शेतकऱ्याची लूट थांबलीच पाहिजे या शेतकऱ्यांची फसवणूकच होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने मनमोहन सिंग पंतप्रधान असताना घोषणा केली होती. आमच्या हातात सत्ता द्या. ज्या स्वामीनाथन समितीवर मनमोहन सिंग सरकार दडपण ठेवत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या काजूला १५० रुपये भाव देऊ मग आता कशामध्ये थांबलं आहे. आता मग मोदीजी का? भाव देत नाहीत. आमच्या शेतकऱ्याच्या काजूला दोनशे रुपये भाव मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. व घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे श्री काकुस्ते बोलताना म्हणाले. कॉ.
अतुल दिघे म्हणाले काजु दरा बाबत प्रयत्न केला पाहिजेत लढ्याची भूमिका हाती घ्यावी लागेल नाहीतर तिसऱ्या पिढी पुढे आम्ही जाऊ शकत नाही. भविष्यात अदानी व अंबानी हे उद्योग ताब्यात घेतील व आपल्याला बघायची भूमिका घ्यावी लागेल. यासाठी या लढ्यात सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे. असे श्री दिघे म्हणाले. यावेळी
काजू उत्पादकांना किलो मागे २०० रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे या मागण्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी २० जानेवारी २०२४ रोजी आजरा येथील जे पी नाईक भवन येथे काजू उत्पादक शेतकरी यांची परिषद संपन्न झाली. काजू तुकडा ६८० रुपये किलो आणि काजू पाकळी ७२० रुपये किलो ने विकली जात असताना काजू उत्पादक शेतकर्याला किलोला १० रुपये मिळावे ही काजू उत्पादक शेतकऱ्याची लूट आहे. पण जनतेचे कल्याण करतो असे म्हणणारे सरकार काजू उत्पादकाना हमी भाव जाहीर करत नाहीत. कारण आपण असंघटीत असून आपल्या हक्का करीता भांडायला उभे राहत नाही हेच आहे. शेजारच्या गोवा राज्यात काजूला हमी भाव दिला जातो आहे. पण महाराष्ट्रात मात्र कवडीमोलाने काजू विकला जात आहे. याबाबत आवाज उठवण्यासाठी आपण आजरा येथे काजू उत्पादक परिषद संघटीत केली आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक
कॉ दत्तात्रय अत्याळकर
अध्यक्ष कॉ राजेंद्र बावके (साकुरी, जिल्हा अहमदनगर ) अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना ● प्रमुख पाहुणे, कॉ उदय भट, विजय कुलकर्णी, अतुल दिघे महा. राज्य सर्व श्रमिक महासंघ अशी प्रमुख मंडळी मार्गदर्शनासाठी होती. यावेळी कॉम्रेड शांताराम पाटील, संजय घाटगे, गोपाल गावडे, रामजी देसाई, अमृत कोकितकर, धोंडीबा कुंभार, कृष्णात चौगुले, तुकाराम तळप, नारायण राणे, नारायण भडांगे, शांताराम हरेर, आबा पाटील, निवृत्ती मिसाल, मान्नाप्पा बोलके, दौलती राणे, हणमंत खामकर, पुंडलिक गावडे, कृष्णा खोराटे, विजू तुपारे, राजाबा पाटील.सह तालुक्यातील काजु उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.