आजरा साखर कारखान्यामार्फत इको सेन्सीटीव्ह झोन मधुन गावे वगळणे.- बाबत वनमंत्री महोदय यांना निवेदन.
आजरा.-प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. अमृतनगर – गवसे, ता.आजरा, जि. कोल्हापूर या कारखान्याने 90 के.एल.पी.डी.इथेनॉल प्रोजेक्ट उभारणेसाठी इन्व्हॉरमेंटल क्लिअरन्स घेणे करीता ना. हसन मुश्रीफसाहेब, वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे चेअरमन वसंतराव धूरे. व्हा.चेअरमन मधुकर देसाई, संचालक अनिल फडके, कोल्हापुर जिल्हा बँकेचे संचालक तथा कारखान्याचे बॅक प्रतिनिधी.सुधीर देसाई तसेच कारखान्याचे कन्सलटंट डॉ. दिपक मेंगाने. विवेक पाटील व कारखान्याचे जनरल मॅनेंजर (प्रोडक्शन) संभाजी सावंत यांनी आज गुरूवार दि. १८ रोजी ना.सुधीर मनगुटीवार, वनमंत्री, मंत्रालय मुंबई यांची भेट घेवून इथेनॉल प्रोजेक्ट उभारणी करीता आवश्यक असलेले इन्व्हॉरमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळणेकरीता सन 2006 व 2014 मध्ये इको सेन्सीटीव्ह झोन मध्ये समाविष्ठ केलेली गवसे व दर्जेवाडी ही गावे इको सेन्सीटीव्ह झोन मधुन वगळणे करीता केंद्रीय मंत्रालयात शिफारस करणेबाबतचे निवेदन दिले. त्यावर ना.सुधीर मनगुटीवार वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दि. 15.02.2024 पुर्वी सदर विषयावर पर्यावरण विभागाची केंद्रीय मंत्रालय दिल्ली येथे मिटींग बोलावुन सदरचा विषय मार्गस्थ करणेबाबतचे आश्वासन दिले.
