कागल विधानसभा नगरीतील नागरिकांचा.- लोकोत्सव.. होणार कागलच्या गैबी चौकात.- नाम. हसन मुश्रीफ फौंडेशनचा उपक्रम अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा वास्तुशांती सोहळा निमित्ताने लोकोत्सव विविध उपक्रमाने होणार संपन्न.
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
कागल विधानसभा नगरीतील नागरिकांचा लोकोत्सव कागल येथील गैबी चौकात नाम. हसन मुश्रीफ फौंडेशनचा आयोजित सदर उपक्रम अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा वास्तुशांती सोहळा निमित्ताने लोकोत्सव विविध उपक्रमाने संपन्न होणार आहे. या उपक्रमाबाबत कागल विधानसभा मतदारसंघातील गावागावात नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन वतीने या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येत आहे. यामध्ये सोमवार दि २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्या येथे संपन्न होत असलेल्या या मंगलमय सोहळ्यानिमित्त श्री गैबी चौक कागल येथे भक्तिमय भजननादी कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची रुपरेशा सकाळी ठीक ९ वा. प्रभू श्री रामचंद्र यांची मूर्ती पूजन सोहळा. परमाब्धिकार परमपूज्य परमात्माराज महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. यासाठी प्रमुख उपस्थिती नाम. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहायक मंत्री महाराष्ट्र राज्य. तसेच सकाळी ठीक ९. वा. महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट यांचा “चक्रीभजन” जुगलबंदी कार्यक्रम यासाठी प्रमुख गायक भजन सम्राट बाळासाहेब वाईकर व डॉ.नीरज लांडे, तसेच दु.१२ वा. आयोध्या येतील ऐतिहासिक प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
त्यानंतर कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघातील आनंद उत्सव निमित्त अयोध्यातील प्रभु श्रीरामाच्या मंदिराचा फोटो असलेली कापडी पिशवी व साखर वाटप. तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील कुलकर्णी व सहकारी पुणे यांचा अभयारण्य हा भक्तिमय भजन कार्यक्रम असे २२ जानेवारी २०२४ अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या वास्तुशांती सोहळा व प्रभू श्री राम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनापणा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी कागल विधानसभा मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रामभक्त व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन कागल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट.
{ कागल विधानसभा मतदारसंघातील उत्तुर जिल्हा परिषद मध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या वास्तुशांती सोहळा व प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने कागल विधानसभा मतदारसंघातील मडिलगे विभागात साखर व प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले या निमित्ताने आजरा कारखाना संचालक दीपक देसाई, सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच सुशांत गुरव, आनंद घाटगे, सखाराम येसने, हेमंत देसाई, सुरेश ढोकरे, सह नागरिक राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील नागरिकांना सदर भेट देण्यात आली. }
