HomeUncategorizedराष्ट्रीय महामार्गाचे - आजरा शहरातील गटर्स कामकाज तोंडे बघून - होत असल्याचा...

राष्ट्रीय महामार्गाचे – आजरा शहरातील गटर्स कामकाज तोंडे बघून – होत असल्याचा नागरिकांचा आरोप.🛑एकनिष्ठ युवा मंच, मडिलगे आयोजित महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा. 👇👇🛑काजू उत्पादक शेतकऱ्याची लूट थांबलीच पाहिजे.- महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना काजू उत्पादक परिषद संघटीत आयोजित – आजऱ्यात भव्य मेळावा.👇👇👇

🛑राष्ट्रीय महामार्गाचे – आजरा शहरातील गटर्स कामकाज तोंडे बघून – होत असल्याचा नागरिकांचा आरोप.
🛑एकनिष्ठ युवा मंच, मडिलगे आयोजित महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा. 👇👇
🛑काजू उत्पादक शेतकऱ्याची लूट थांबलीच पाहिजे.- महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना काजू उत्पादक परिषद संघटीत आयोजित – आजऱ्यात भव्य मेळावा.👇👇👇

आजरा – प्रतिनिधी.

काजू उत्पादक शेतकऱ्याची लूट थांबलीच पाहिजे काजू उत्पादकांना किलो मागे २०० रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे या मागण्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी २० जानेवारी २०२४ रोजी आजरा येथील जे पी नाईक भवन काजू उत्पादक शेतकरी बंधुहो काजू तुकडा ६८० रुपये किलो आणि काजू पाकळी ७२० रुपये किलो ने विकली जात असताना काजू उत्पादक शेतकर्याला किलोला १० रुपये मिळावे ही काजू उत्पादक शेतकऱ्याची लूट आहे. पण जनतेचे कल्याण करतो असे म्हणणारे सरकार काजू उत्पादकाना हमी भाव जाहीर करत नाही कारण आपण असंघटीत असून आपल्या हक्का करीता भांडायला उभे राहत नाही हेच आहे. शेजारच्या गोवा राज्यात काजूला हमी भाव दिला जातो आहे. पण महाराष्ट्रात मात्र कवडीमोलाने काजू विकला जात आहे. याबाबत आवाज उठवण्यासाठी आपण आजरा येथे काजू उत्पादक परिषद संघटीत करीत आहोत आजरा येथे दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जे पी नाईक सभागृह येथे परिषद होईल. या परिषदेचे
• उदघाटक
कॉ दत्तात्रय अत्याळकर
अध्यक्ष कॉ राजेंद्र बावके (साकुरी, जिल्हा अहमदनगर ) अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना ● प्रमुख पाहुणे
कॉ सुभाष काकुस्ते शेतकरी संघटना • प्रमुख उपस्थिती •
कॉ उदय भट, विजय कुलकर्णी, अतुल दिघे महा. राज्य सर्व श्रमिक महासंघ अशी प्रमुख मंडळी मार्गदर्शनासाठी आहेत तरी सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
शांताराम पाटील, गोपाल गावडे, रामजी देसाई, अमृत कोकितकर, धोंडीबा कुंभार, कृष्णात चौगुले, तुकाराम तळप, नारायण राणे, नारायण भडांगे, शांताराम हरेर, आबा पाटील, निवृत्ती मिसाल, मान्नाप्पा बोलके, दौलती राणे, हणमंत खामकर, पुंडलिक गावडे, कृष्णा खोराटे, विजू तुपारे, राजाबा पाटील. यांनी केले आहे.

🛑एकनिष्ठ युवा मंच, मडिलगे आयोजित महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा. 👇👇

आजरा.- प्रतिनिधी.

ता. आजरा, जि. कोल्हापूर श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्य भव्य आयोजित कोल्हापूर जिल्हा कबड्डी, असोसिएशनच्या मान्यतेने १९ व २० जानेवारी २०२४ रोजी ६० किलो वजनी गटातील निमंत्रीत पुरूषांच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामधील भव्य बक्षीसे प्रथम क्रमांक- व
आकर्षक चषक २१,००१ रू

प्रवेश फ्री ३०१

द्वितीय क्रमांक व आकर्षक चषक
१५,००१ रू/-
तृतीय क्रमांक व आकर्षक चषक
११,००१ रू/-
चतुर्थ क्रमांक व आकर्षक चषक
७,००१ रू/-
उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड उत्कृष्ट खेळाडू आकर्षक भेटवस्तू आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
नियम व अटी व पंचांचा निर्णय अखेरचा अशा सूचना नियोजन दिल्या आहेत.

खालील नंबर वर संपर्क करावा.

अमित देसाई :- 7397969660
ओमकार हारळकर :- 9730812052
ओमकार खवरे :- 8855813053
तेजस हाटवळ :- 9923357785

🛑राष्ट्रीय महामार्गाचे – आजरा शहरातील गटर्स कामकाज तोंडे बघून – होत असल्याचा नागरिकांचा आरोप.

आजरा – संभाजी जाधव.

संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्गाचे आजरा शहरातील गटर्स कामकाज तोंडे बघून होत. असल्याचा आरोप आजरा शहरातील नागरिकांच्या कडून होत आहे. शासकीय विश्रामगृहापासून येत असलेला महामार्ग हा ठिकठिकाणी वळणे घेत आहेत. तर काही ठिकाणी खाजगी हद्दीतून जात आहे. तर शासकीय हद्दीतील जागा तंतोतंत घेत सोबत संस्थेच्या जागेला देखील प्राधान्य दिले आहे व खाजगी जागा जास्त घेत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. एक तर हा मार्ग सरळ घ्या अन्यथा एकास एक अशी वागणूक देऊ नये हा सर्व कारभार राजकीय होत आहे. अनेक ठिकाणी सरळ जाणारा मार्ग वळण घेत आहे. असे एकास एक का केले जात आहे. तर दुसरीकडे शहरातील काम लवकरात लवकर व्हावे. अशीही मागणी होत आहे. त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग वरिष्ठ अधिकारी यांनी सदर आरोपाबाबत पडताळणी करण्यासाठी चालू असलेला मार्ग व गटर्स तपासून घ्याव्यात कोणत्या गटर्सने कुठे वळण घेतले व कसे घेतले याची पाहणी करणे गरजेचे आहे.
अन्यथा शहरातून जाणाऱ्या मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्व कामकाज राष्ट्रीय महामार्गाच्या नियमात होत आहे. तर मग कोणाच्या दबावाखाली महामार्ग रस्त्यांची वळणे बदलली जात आहेत. ज्या ठिकाणी विचारणारे कोणी नाही त्या ठिकाणी रस्ता आत मध्ये घेतला जात आहे. व काही ठिकाणी वळण घेत गटर्स बांधली जात आहेत. हे कामकाज असेच चालल्यास आजरा शहरातील प्रमुख मार्गातील रहिवासी याबाबत नक्कीच आवाज उठवणार असल्याचे समजते. यासाठी वरिष्ठ अधिकारी याबाबत तपासणी करावी अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर आजरा नगरपंचायत कडून संभाजी महाराज चौक ते पोलीस स्टेशन या रस्त्यावर मागील पंधरा दिवसापासून पाणी लिकेज मुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य यामुळे गाड्या स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे नगरपंचायत कधी लक्ष देणार. बस स्थानकाच्या बाजूच्या गल्लीमध्ये गटरीचे पाणी रस्त्यावर येऊन चिखलाचे साम्राज्य व दुर्गंधी वाढली आहे याचा त्रास स्थानिक नागरिक व प्रवाशांना होत आहे याबाबत योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.