HomeUncategorizedजाती व धर्मापलिकडे जाण्यासाठी संविधानाच्या अंमलबजावणीची गरज आहे.- प्रा.सुरेश बुगडे ( कोळिंद्रेत...

जाती व धर्मापलिकडे जाण्यासाठी संविधानाच्या अंमलबजावणीची गरज आहे.- प्रा.सुरेश बुगडे ( कोळिंद्रेत “रांड पुनवं” हा महिलांच्या शोषण परंपरा कायमची बंद करण्याचा महिलांचा निर्णय.)

जाती व धर्मापलिकडे जाण्यासाठी संविधानाच्या अंमलबजावणीची गरज आहे.- प्रा.सुरेश बुगडे ( कोळिंद्रेत “रांड पुनवं” हा महिलांच्या शोषण परंपरा कायमची बंद करण्याचा महिलांचा निर्णय.)

आजरा.- प्रतिनिधी.

जाती व धर्मापलिकडे जाण्यासाठी संविधानाच्या अंमलबजावणीची गरज आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट कोळिंद्रे व संविधान सन्मान परिषद यांच्या वतीने “१२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती” साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरेश बुगडे बोलत होते पुढे बोलताना म्हणाले. आपले मूलभूत अधिकार व हक्क जाणून घेण्यासाठी संविधानाचा जागर अशा जयंती मधून झाला पाहिजे.हेच खरे राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन होईल. आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही टिकण्यासाठी आपण प्रत्येकाने गांभीर्याने या काळात चालले पाहिजे. प्रशासन व्यवस्थेवर आपण आपला बचक संविधानाच्या माध्यमातून बसविला पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, वेगवेगळे कायदे विषयक मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. असे बोलताना प्रा. श्री बुगडे म्हणाले
यावेळी बोलताना संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संघटक संग्राम सावंत म्हणाले, जिजाऊंच्या खऱ्या विचारांचा जागर होणे ही फार काळाची मोठी गरज आहे. यासाठी सर्वांनी जिजाऊंपासून ते संविधानापर्यंतचा जो इतिहास आहे. हा इतिहास सगळ्यांनी समजून घेण्यासाठी जयंतीचे असे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. अभिमान,स्वाभिमान आणि रयतेचे स्वराज्य या गोष्टी जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात कोरलेल्या होत्या. असे श्री सावंत म्हणाले.
यावेळी सविता कांबळे व पूजा कांबळे यांनी आपले विचार मांडले. तसेच जान्हवी, आयेशा, कार्तिकी अथर्व व आरोही या लहान मुला-मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या संदर्भात भाषणे केली.

चौकट

कोळिंद्रे ता. आजरा या गावामध्ये “रांड पुनवं” हा महिलांच्या शोषण परंपरा जपणारा कार्यक्रम दरवर्षी घेतला जात होता. ती प्रथा परंपरेने चाललेली शोषणाची ही परंपरा कायमस्वरूपी बंद करून एक नवे पाऊल टाकण्याचा प्रयत्न व धाडस केलेल्या महिलांचा सत्कार यावेळी प्रमुख वक्ते प्रा श्री. बुगडे व प्रा.वसंत कांबळे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कोळिंद्रे ग्रामपंचायत सदस्या मेघा जाधव, नंदा जाधव, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील,भिकाजी गोंधळी,विजय कांबळे, अक्षय कांबळे मजीद मुल्ला, समीर खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते नरसु शिंदे, रविंद्र भोसले, संजय कांबळे, हेमंत आयवळे, रवि कांबळे, आनंदा सुतार, अक्षय कांबळे आणि संविधान गटातील महिला मुली-मुले व पुरुष मंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन मारूती कांबळे यांनी केले.आभार व्यक्त सुरेखा कांबळे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.