HomeUncategorizedगारगोटी - आजरा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंक (ADB) योजनेतून 246 कोटी रुपयांचा...

गारगोटी – आजरा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंक (ADB) योजनेतून 246 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर.👇🛑काजू उत्पादक परिषद यशस्वी करण्याचे.- काॅ.शांताराम पाटील यांनी केले आवाहन.👇

🛑गारगोटी – आजरा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंक (ADB) योजनेतून 246 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर.👇
🛑काजू उत्पादक परिषद यशस्वी करण्याचे – काॅ.शांताराम पाटील यांनी केले अवाहन.👇

गारगोटी प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तालुक्यातील गारगोटी-सोनारवाडी-ममदापूर-देवकांडगाव-पेरणोली-आजरा या 37 कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB ) अंतर्गत 246 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाची सुरवात करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगितले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गारगोटी-सोनारवाडी-ममदापूर-देवकांडगाव-पेरणोली-आजरा या रस्त्याची लांबी 37 किलोमीटर आहे. हा रस्ता भुदरगड तालुक्यातील अनेक गावांतून जातो. हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत होता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी व पर्यटकांसह अनेकांची आहे. सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात गोव्याला जाणारे पर्यटक व गोवा भागातून बाळूमामा देवस्थानच्या दर्शनासाठी या रस्त्यावरून जात असून हा रस्ता लहान असल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती.

हा रस्त्या पुर्ण झाल्यानंतर आणखी पर्यटकांची संख्या वाढणार असून यामुळे याभागातील नागरीकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना, व्यापारी वर्गाला, विद्यार्थ्यांना तसेच पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे सोपे होईल. त्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.
याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे.

🛑काजू उत्पादक परिषद यशस्वी करण्याचे आवाहन.- काॅ.शांताराम पाटील यांनी केले.

आजरा.-प्रतिनिधी.

मंबईत बैठकीच्या खोलीत एक हात जागेत, वळकटीवर गिरणीकामगारनी आयुष्य
घालवून, गावच्या विकासाला हातभार लावला होता. मंबईत गिरणी उद्योग उध्वस्त झाल्यावर, गिरणीकामगार शेतकरी झाला . येथील शेतकरी याचे अनेक प्रश्न आहेत. या पैकी काजू बियांना हमी भाव मिळावा यासाठी काजू उत्पादक परिषद यशस्वी करण्याचे आव्हान काॅ. शांताराम पाटील यांनी परिषद नियोजनाच्या बैठकीत केले.
यावेळी पाटील यांनी महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहूजनाची शिक्षणाची दारे खुली केल्याने , जनजागृतीनिर्माण झाली.पूर्वी एखादे पत्र वाचून घ्यायला, गाडी भर लाकडे फोडून घेतली जात होती.आता ही भांडवलदार तसेच वागत आहेत. ही परिषद महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना च्या वतीने होत आहे. यासाठी राज्य पातळीवरील प्रमुख नेतृत्व काॅ.राजेंद्र बालके याच्या अध्यक्ष ते खाली काॅ.सुभाष काकुस्ते मार्गदर्शन करणार आहेत व काॅ.उदय भट, काॅ. अतूल दिघे, काॅ. दत्तात्रय अत्याळकर प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तरी जिल्हातील गिरणीकामगार, शेतकरी व काजू उत्पादक यानी परिषदला उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
यावेळी गोपाळ गावडे गिरणीकामगार चंदगड तालूका अध्यक्ष यांनी काजू दरासाठी शेतकरी संघटीत होऊन, लढा उभारला पाहीजे. शासनाने आयात काजू स्वस्त केला. आणि निर्यातीला कर लावला त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. यावेळी संजय घाटगे यांनी गिरणीकामगारनी संयुक्त महाराष्ट्र सह वेगवेगळ्या चळवळीत भाग घेत सर्व श्रमिक संघटना पेन्शन, रेशनींग, शेती पिकांना हम्मी भाव याच्यासह अस्तित्वाची लढाई सुरू असल्याचे सांगितले. प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले, यावेळी शांताराम हारेर ,मनप्पा बोलके, जे के सावंत, जानबा धडाम, दौलती राणे, हिंदूराव कांबळे, जोतीबा सासुलकर,आबा पाटील, नारायण राणे याच्या सह गिरणी कामगार उपस्थित होते. आभार निवृत्ती मिसाळ यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.