🛑प्रकल्पग्रस्तांना घर बांधणीसाठी अनुदान देण्याचा राज्यसरकरचा निर्णय.- श्रमिक मुक्ती दलाच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश.
🛑शासन व बाधित शेतकरी.- सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर एक पाय मागे.( खेडे-मडिलगे जवळील पूल बांधण्यास बाधित शेतकऱ्याची संमती.)
🛑आजरा महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान.
आजरा – प्रतिनिधी.
श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने केलेल्या लढ्याला अखेर यश आले असून प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे घरबांधणी अनुदान म्हणून १ लाख ६५००० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. यबोबरच राहत्या गावापासून विस्थापित ठिकाणापर्यंत संसार उपयोगी साहित्य हलविण्यासाठी प्रति कुटुंब रुपये पन्नास हजार, ज्या कुटुंबाची गुरे आहेत. त्यांना गोठा बांधण्यासाठी रुपये पन्नास हजार, कारागीर कुटुंबाना त्यांचा नव्या गावी व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार आणि दुकानासाठी पन्नास हजार अशी रक्कम देण्याचा जीआर काढण्यात आला आहे. विकसनशील पुनर्वसनाचा मुद्दा घेऊन गेली अनेक वर्षे श्रमिक मुक्ती दलाने हे विषय लावून धरले होते. भूसंपादन व पुनर्स्थापना अधिनियम २०१३ मधील नियमाच्या आधारे हे शासन निर्णय करावेत अशी मागणी श्रमुदने गेली अनेक वर्षे लावून धरली होती. त्यासाठी डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिय्या आंदोलने, लॉंग मार्च, परिषदा मोर्चे श्रमुदने संघटित केले होते. याची दखल घेत २०१४ पूर्वी मान्यता मिळालेल्या सर्व धरण प्रकल्पांना हे निर्णय लागू होणार आहेत. अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई यांनी दिली.
शासन व बाधित शेतकरी.- सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर एक पाय मागे.( खेडे-मडिलगे जवळील पूल बांधण्यास बाधित शेतकऱ्याची संमती.)
आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचा निर्णय दि.११ रोजी खेडे आजरा येथे हनुमान मंदिर मध्ये महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली यावेळी प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत ज्या शेतकऱ्यांचे घर बाधित होणार आहे त्याला निवाराशेड बांधून देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रोड लगत असताना आतील जमिनीचा दर धरून निवाडा झाला त्यांचे दर बदलणे, मडीलगे येथील शेतकऱ्याचे हॉटेल धाबा होता ते बांधकाम विनंती करताच काढून घेतले मात्र संबंधितांना मोबदला दिला नाही तो दिला जाईल या सर्व आश्वासनाची पूर्तता करून काही त्रुटी दूर करण्याच्या कराव्या लागणार आहेत या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या अटीवर फक्त पुलाचे काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. कामाची पूर्तता न झाल्यास काम बंद केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. इतर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना दिलेल्या मोबदल्यापेक्षा संकेश्वर- बांधा महामार्ग बाधिताने कमी मोबदला दिला जात आहे. नवीन जीआर २०२२ मध्ये शासनाने केला आहे त्यामुळे २०% कपात करण्याचा शासन निर्णय बदलावा लागणार आहे. त्यासाठी संघटना प्रतिनिधी पालकमंत्री यांना भेटणार आहेत तसा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला संघटना अध्यक्ष शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे दिगंबर होरंबळे, सागर भाटले, अनिल शिंदे, विलास गोडसे, गणपती येसने, लता मोरबाळे, अनिता भाटले, मंगल खोराटे, आप्पासो पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आजरा महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मासेवाडी येथे संपन्न होत आहे या शिबिरामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय रश्मी गाडगीळ यांनी महिला सबलीकरण व सक्षमीकरण याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या महिलांची त्यांच्या लहानपणापासूनच आरोग्याची काळजी घेतली गेली तर त्यांचे सामाजिक आर्थिक सबलीकरण व सक्षमीकरण चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. आज वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत असून त्यांना सामोरे जाण्यासाठी आपले आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. यावेळी त्यांनी महिलांना आरोग्य विषयक येणाऱ्या अडचणी समस्या या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मासेवाडी गावातील महिलांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण केले होते त्या अनुषंगाने त्यांनी येथील महिलांना येणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींची सविस्तर चर्चा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समृद्धी चोडणकर आभार सिद्धी होरंबळे हिने मानले
या कार्यक्रमासाठी सहायक प्रकल्प अधिकारी प्राध्यापिका लता शेटे व महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका,मौजे मासेवाडी येथील ग्रामस्थ माता भगिनी उपस्थित होत्या.
