HomeUncategorizedसुशिक्षित बेरोजगार उद्योजक यांच्याकरिता तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.- आजरा...

सुशिक्षित बेरोजगार उद्योजक यांच्याकरिता तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.- आजरा तहसीलदार समीर माने.

सुशिक्षित बेरोजगार उद्योजक यांच्याकरिता तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.- आजरा तहसीलदार समीर माने.

आजरा प्रतिनिधी.

सुशिक्षित बेरोजगार उद्योजक यांच्याकरिता तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन असल्याची माहिती आजरा तहसीलदार समीर माने यांनी दिली या मार्गदर्शन मेळाव्यात जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे निर्देशाप्रमाणे केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ आजरा सुशिक्षित बेरोजगार व नव उद्योजक यांना रोजगार व कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार नवोद्योजक यांना व्हावा याकरिता दि.१२ रोजी सकाळी ११ वा. प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय आजरा येथे सुशिक्षित बेरोजगार उद्योजक यांच्याकरिता तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये नव – उद्योजक व सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार व कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या जिल्हा समन्व्यक सर्व बँका, जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य वित्त आणि विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार व चर्मो उद्योग महामंडळ, महात्मा फुले मागास्वर्ग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मगर वर्गीय वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ, मत्स्य व्यवसाय कार्यालय तांत्रिक, दुग्ध विकास विभाग, जि. प. कोल्हापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था महिला आर्थिक विकास महामंडळ, तालुका स्तरीय सर्व बँक प्रतिनिधी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर, जिल्हा रेशीम उद्योग विभाग कोल्हापूर, समाज कल्याण विभाग कोल्हापूर, संचालक, आरसे टी, कोल्हापूर इ. विभागाचे स्टॉल लावण्याचे नियोजन सदर मेळाव्यात करण्यात आलेले आहे. तरी सदर मेळाव्यास आजरा तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. त्याचप्रमाणे सदर मेळाव्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार नवद्योजक यांना सदर कार्यक्रमाची माहिती देऊन नवउद्योजक घडवण्याचे शासनाचे ध्येय असून या मार्गदर्शन मिळवण्यासाठी तालुक्यातील नवोद्योगांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आजरा तहसील प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.