Homeकोंकण - ठाणेआजरा पोलीसांच्या कारवाईत - ४ लाख ७० हजारची गोवा बनावटीची दारु जप्त.

आजरा पोलीसांच्या कारवाईत – ४ लाख ७० हजारची गोवा बनावटीची दारु जप्त.

आजरा पोलीसांच्या कारवाईत – ४ लाख ७० हजारची गोवा बनावटीची दारु जप्त

आजरा. प्रतिनिधी. ३१.

आजरा आंबोली रोडवर तुळसी धाब्यानजीक आजरा पोलीसांनी कारवाई करत ४ लाख ७० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे.
याप्रकरणी शिवाजी ग्यानबा भुते व गणेश महादेव पिंगळे (दोघे रा.खर्डा, ता. जामखेड, जि.अहमदनगर) यांच्यावर कारवाई केली आहे. हे दोघे अरोपी आपल्या टाटा टेम्पो ( नं. MH ४२ B ९८७३) मधून गोवा बनावटीची दारु बेकायदेशीररित्या वाहतूक करत असताना गवसे.ता. आजरा जवळील तुळशी धाब्याजवळ सदर टेम्पोला पोलीसांनी अडवून तपासणी केली असता गाडीच्या हौदात सुमारे ४ लाख ७० हजारांची गोवा बनावटीची दारु आढळून आली यामध्ये मॅकडॉनल नं. १ चे १२१ बॉक्स (किंमत रु.३ लाख ७१ हजार ७१२), रॉयल व्हिस्की चे २४ बॉक्स (किंमत ९७ हजार ९२०) या दारुप्रकाराचा समावेश आहे. गाडीसह ९ लाख ७५ हजार १३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पो. ह जाधव करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.