राज्यात लाँकडाऊन पंधरा दिवसांनी वाढवले.- पहा..नवा नियम.
मुंबई. प्रतिनिधी. 30.
राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. मात्र काही जिल्ह्यांत रुग्णवाढ अद्यापही असल्याने राज्य सरकारने 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.