मोदी सरकारचे सात वर्ष पूर्ती निमित्त मंगळवार पेठ मंडळ ,कोल्हापूर चे वतीने विविध उपक्रम…
कोल्हापूर प्रतिनिधी:
गेली सव्वा वर्षे संपूर्ण देशभर भा.ज .पा .चे माध्यमातून सातत्याने सेवा कार्य चालू आहे.
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे सात वर्षे पूर्ती निमित्त संपूर्ण देशभर विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.
याच अनुषंगाने आज भा.ज. पा.चे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार चंद्रकांत पाटील,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष मा.महेश जाधव,जिल्हा अध्यक्ष मा.राहुल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई,हेमंत उपाध्ये यांचे सहकार्याने
भा.ज. पा .मंगळवार पेठ मंडळ कोल्हापूर यांचे वतीने कोरोना काळात रुग्णाची व त्यांचे नातेवाईकांची सेवा करणाऱ्या आशा वर्कर्स,मदतनीस यांचा सत्कार करणेत आला.
स्वच्छता मोहीम..
भा.ज.पा.मंगळवार पेठ मंडळ चे सुभाष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मावती मदिर परिसरातील स्वच्छ ता करणेत आली.
- आयुर्वेदिक काढा वाटप*
आयासोलेशन हॉस्पिटल मधील कोरोना रुग्णांना व हॉस्पिटल कर्मचारी यांना देखील मंगळवार पेठ मंडळ चे उपाध्यक्ष प्रीतम यादव ,सुधीर देसाई यांच्या हस्ते वाटप करणेत आला.
या उपक्रम प्रसंगी सरचटणीस गणेश देसाई,सुधीर देसाई, युवा चिटणीस रोहित कारंडे , नगरसेवक विजय खाडे , सयाजी आळतेकर,बाबासाहेब पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ . किशोरी स्वामी, महिला मंडळ उपाध्यक्षा सौ.पद्मजा माळी,सौ सरिता माळी, सौ .स्वाती कदम, सौ.प्रबोधिनी हार्डीकर, सौ .राधिका कुलकर्णी , सौ.सुलभा मुजुमदार, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.