आजरा उबाठा शिवसेनेचेने केला नार्वेकरांचा निषेध.- भाजप व शिंदे, सरकारवर, हल्लाबोल.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील उबाठा शिवसेनेच्या वतीने संभाजी महाराज चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचा दिलेला निर्णयाच्या निषेधार्थ तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले राहुल नार्वेकर यांनी जो काल निकाल दिला तो निकाल म्हणजे त्यांनी आदेश पाळला आहे. तसं त्यांच्या हातात काहीच नाही त्यांनी भाजपच्या नेत्यांचा आलेला निकाल त्यांनी इंग्रजीत वाचून दाखवला आहे. त्यामुळे त्यांची कामकाज हे निषेधार्थ आहे. भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला वेटीस धरून महागाईचा भस्मासुर लोकांच्या पदरी मारून जनतेला नेहमीच वेटीस धरण्याची काम काम खऱ्या अर्थाने भाजप करत आहे . परंतु मतदार राजा सर्वसामान्य जनता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. येणाऱ्या काळात विधानसभा, लोकसभा निवडणुकीत हा निकाल काय आहे खऱ्या अर्थाने समोर येईल. व या भाजपला जनताच धडा शिकवेल असे बोलताना म्हणाले यावेळी तालुकाप्रमुख युवराज पवार म्हणाले की भाजप हे शंड सरकार आहे. पक्ष फोडी करण्यापेक्षा हिम्मत असेल तर रिंगणात उतारा आमने सामने या बघू मतदार कोणाला जागा दाखवते.. राहुल नार्वेकर हा भाजपचा गडी आहे. तो दिलेल्या आदेशाचे पालन करून निकाल दिला आहे त्यांना स्वतःचे मत अजिबात नाही दुसऱ्याच्या मतावर चालणारा हा राहुल नार्वेकर हा विधानसभेचा अध्यक्ष म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. भाजप हे मिंदे सरकार 2024 ला अस्तित्वात असणार नाही हा निकाल जनताच लावेल असे श्री बोलताना पोवार म्हणाले.
यावेळी, संभाजी पाटील, संजय येसादे ,समीर खेडेकर कृष्णा पाटील यांनी यांच्या निषेधार्थ मनोगत व्यक्त केले. या निषेध निदर्शनात उभाठा शिवसेनेचे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख राजेंद्र सावंत, दिनेश कांबळे दयानंद भोपळे, महेश पाटील, ओमकार माधाळकर, सह शिवसेना युवा सेना सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
