🛑ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी.- जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी कारवाई
(ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड.)
🛑शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? २ फेब्रुवारीला होणार सुनावणी.
आमदार रवींद्र वायकरांच्या भागीदारांच्या घरावर तसेच कार्यालयावरही ईडीचा छापा
(ईडीचे १० ते १२ अधिकारी रवींद्र वायकर यांच्या घरी दाखल तर चौकशी सुरू.)
(तर आमदार रवींद्र वायकरांच्या संबंधित ७ ठिकाणी ईडीचे छापे.)
(सकाळी ८ – ३० वाजल्यापासून ईडीचे पथक वायकरांच्या घरी दाखल.)
मुंबई :- प्रतिनिधी.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळपासून ईडीची रेड सुरू झाली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे.
तर जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा नोटीस धाडली होती. अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी ८ – ३० वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांचे आरोप नेमके काय?
ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. २३ तारखेला सकाळी ११ वाजता त्यांना पोलीस मुख्यालयात बोलवलं आहे. रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.
🛑प्रकरण नेमकं काय?
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? २ फेब्रुवारीला होणार सुनावणी.
नवी दिल्ली:-

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणी २ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्यावतीने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही संभाव्य तारीख नमूद करण्यात आली आहे.
यापूर्वी शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव या प्रकरणावर १५ डिसेंबरला सुनावणी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सुनावणी नव्या वर्षात २ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेनुसार शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचाही निर्णय १० जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. लोकसभा निवडणुका फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीची ही संभाव्य तारीख महत्त्वाची आहे. तत्पुर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचाही निर्णय येणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी १० जानेवारी, २ फेब्रुवारी अशा महत्त्वाच्या तारखा समोर असणार आहेत.
