🛑आजरा – क्रीडासंकुलन मैदाना नजीक कचरा डेपो स्थलांतरित करा.- तालुक्यातील क्रिकेट प्रेमींची मुख्याधिकारी यांना निवेदनाने मागणी.
🛑आजरा तालुका भाजप नूतन पदाधिकारी निवडी.
🔴थोडयात वेळात अपात्रेचा निकाल लागणार
राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे देशाचे लक्ष.👇👇
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा गांधीनगर येथील क्रीडासंकुलन मैदानाच्या नजीक असलेल्या कचरा डेपो स्थलांतरित करावा याबाबत तालुक्यातील क्रिकेट प्रेमींची मुख्याधिकारी यांना निवेदनाने मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षे नंतर आजरा ताल्लुक्याच्या इतिहासात प्रथमच एका प्रशस्त मैदानाची निर्मिती झाली, क्रीडासंकुल आजरा! कोल्हापुर जिल्हया मध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या अनेक मैदानांपेसा देखील प्रशस्त आणि सुंदर मैदान महाराष्ट्र शासनाच्या वतीने तयार केले आहे, ही आम्हां आजरा कमियांसाठी अभिमानाची गोष्ट । बाब आहे. पण, या क्रीडासंकुलाच्या बाबत एक सवात मोठे दुर्दैव असे आहे की, आजरा शहरातील व परीसरातील सर्व ओला व सुका कचरा हयाच क्रीडासंकुलाच्या शेजारी टाकला जात आहे. अशा तन्हेने वर्षर्षानुवर्षे हा कचरा क्रीडासंकुलाच्या शेजारी टाकला जात असल्यामुळे या परिसरात खूपच दुर्गंधी पसरत आहे.
सकाळच्या सत्रात नगरपंचायत कर्मचारी वर्गा कहुन् हा कचरा पेटविण्यात येतो, त्यामुळे हया परिसरातील दुर्गंधी दुप्पटीने वाढते तसेच क्रीडासंकुल च्या मैदानावर मोठ्या प्रमाणात धूराचे लोट पसरतात. सकाळच्या सत्त्रात हया क्रीडासंकुलाच्या मैदानावर अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी व्यायाम रनिंग तसेच विविध मैदानी खेळांचा सराव करत असतात. अनेक वृद्ध तसेच तरून नागरिक रोजच्या व्यायामासाठी येत असतात. त्याचप्रमाणे आजरा तसेच आजुबाजुच्या गावातील क्रिकेट खेळाडू रोज सकाळी क्रिकेटचे सराव सामने खेळण्यासाठी येत असतात. गेल्या दोन महिन्यांपासुन स्या मैदानावर वारंवार क्रिकेटच्या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. तसेच स्थुन पुढील काळात देखील क्रिकेट तसेच इतर अनेक मैदानी खेळांचे तालुकास्तरिय व जिल्हासारिय सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. पण, कचरा डेपो मधुन रोज येणाऱ्या दुगंधी आणि धुराच्या लोटांमुळे हे सामने यशस्वीरित्या पार पाडण्यात अडचणी येत आहेत. आजचऱ्याचे भूषण असलेल्या या मैदानावर अशा प्रकारे दुर्गंधी असते ही आपल्या आजरेकरांसाठी खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे.
तरी नगरपंचायतने लवकरात लवकर सदर कचरा डेपो या ठिकाणाहून स्थलांतरित करावा व सर्व खेळाडुंना सहकार्य करावे ही विनंती. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर तालुक्यातील क्रिकेट प्रेमाच्या सह्या आहेत.
🛑आजरा तालुका भाजप नूतन पदाधिकारी निवडी.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील भारतीय जनता पार्टी आजरा तालुका नूतन पदाधिकारी निवड नुकतीच पार पडली यामध्ये
तालुका उपाध्यक्ष
विठ्ठल उत्तुरकर, पांडुरंग लोंढे,
लहू वास्कर, समीर पारदे
निवृत्ती शेंडे, शैलेश मुळीक
ता. सरचिटणीस
अतिशकुमार देसाई
प्रकाश शिंदे
ता. चिटणीस
अनिल पाटील, राजाराम पोतनीस अनिल नार्वेकर, अनिल पाटील, नंदाताई गुरव, प्रकाश कविटकर, सुरेश सावंत, उमेश घोरपडे,
आजरा शहर अध्यक्ष
अभिजीत रांगणेकर
भाजप युवा मोर्चा
रुपेश परिट – युवा मोर्चा ता. अध्यक्ष
राहुल पेंडसे – ता. सरचिटणीस
शुभम पाटील.- आजरा शहराध्यक्ष
विशाल आढाव.- ता.उपाध्यक्ष
सुरज पाटील.- ता. चिटणीस
भाजप सेल पदाधिकारी.

अभिजीत इंजल.- सेल शहराध्यक्ष व्यापारी.
शशिकांत कांबळे ता. अध्यक्ष (sc)
मुकुंद कांबळे.- ता. उपाध्यक्ष )(sc)
अभिजीत शिंदे शहराध्यक्ष. (sc )
गौतम भोसले. ता. चिटणीस (obc)
भाजप शाखा पेरणोली
नामदेव मोहिते.- शाखाध्यक्ष
प्रशांत सोले – उपाध्यक्ष
लहू सावंत. सचिव.
अशा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आजरा तालुका नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आले असल्याचे आजरा भाजपचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांनी सांगितले.

🔴थोडयात वेळात अपात्रेचा निकाल लागणार
राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे देशाचे लक्ष
🛑आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदेंच्याच बाजूने लागणार सुत्रांची माहिती. / राहुल नार्वेकर ठाकरेंच्या विरोधात निकाल देणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. /🟥अपात्रेचा निकाल उध्दव ठाकरेंच्या विरोधात लागणार?
बाळासाहेब भवनची सुरक्षा वाढवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविला.
