HomeUncategorizedराष्ट्रीय महामार्गाच्या अन्यायी कामकाजा विरोधात आत्मदहनाचा इशारा योग्य न्याय मिळाल्याने स्थगिती.( इशारा...

राष्ट्रीय महामार्गाच्या अन्यायी कामकाजा विरोधात आत्मदहनाचा इशारा योग्य न्याय मिळाल्याने स्थगिती.( इशारा देण्यामध्ये प्रशासनाला वेठीस धरने हा हेतू मुळीच नव्हता. – समीर मोरजकर आजरा. )

राष्ट्रीय महामार्गाच्या अन्यायी कामकाजा विरोधात आत्मदहनाचा इशारा योग्य न्याय मिळाल्याने स्थगिती.
( इशारा देण्यामध्ये प्रशासनाला वेठीस धरने हा हेतू मुळीच नव्हता. – समीर मोरजकर आजरा. )

आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाच्या अन्यायी कामकाजा विरोधात आजरा येथील समीर मोरजकर यांनी आजरा प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता.
परंतु आजरा प्रशासन यांच्या सहकार्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी योग्य असा न्याय दिल्यामुळे आपण इशारा मागे घेत असल्याचे मोरजकर यांनी निवेदन आजरा तहसीलदार यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शुक्रवार दि.५ रोजी निवेदनाद्वारे आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता, त्याची दखल घेऊन तहसीलदार समीर माने तसेच नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी महामार्ग ठेकेदार यांच्याशी चर्चा करण्यासाठी बैठक घडवून आणली. तसेच दि. ९ रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता अनिल पाटील यांनी जागेवर येऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यावेळी आमची मागणी त्यांनी समजावून घेतली व ती योग्य आहे. हे त्यांच्या लक्षात आले. त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ कामावरील अभियंत्याला बोलवून रस्ता आमच्या गट नंबर ला घासून घेण्यास सांगितले. व आमच्या सहमतीने आमच्या मालकीची केवळ दोन झाडे तोडण्यास सांगितले. वरील प्रमाणे आमची मागणी होती ती मान्य झालेली असल्याने आत्मदहन करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. हा इशारा देण्यामध्ये प्रशासनाला वेठीस धरने हा हेतू मुळीच नव्हता हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. आपल्या व आपल्या महसूल विभागाच्या सहकार्याने आमच्या प्रयत्नांना यश आले त्याबद्दल आपले, तहसीलदार व प्रशासनाचे आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.