शेत जमीन खरेदीसाठी १२ लाख कर्ज वितरण आजऱ्यातील बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेच्या सभासदांना कर्ज.
आजरा /प्रतिनिधी.३०
आजरा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्था व कोल्हापूर जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँक यांचे वतीने संस्थेच्या सभासद उषा कृष्णाजी देसाई यांना जमीन खरेदीसाठी १२वर्षे मुदतीने १२लाख मध्यम मुदत कर्जाचे वितरण जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांच्या हस्ते करण्यात आले.या कर्जाबरोबरच ३सभासदांना किसान सहाय्य मध्यम मुदत ४लाख ८०हजार कर्जाचे वितरण करण्यात आले.संस्थेने आजपर्यंत १२सभासदांना ३६लाख मध्यम कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.यावेळी बोलताना संचालक अशोक चराटी म्हणाले जिल्हा बँकेमार्फत वेगवेगळ्या कर्जाचे वितरण करण्यात येत असून तालुक्यातील ग्रामीण भागातील सेवा संस्थेनी याचा लाभ घ्यावा असे अहवान केले.यावेळी आजरा साखर कारखाना चेअरमन प्रा.सुनील शिंत्रे ,संस्थेचे संस्थापक नगरसेवक संभाजी पाटील,युवराज पोवार, विभागीय अधिकारी जयवंत पाटील, निरीक्षक शिवाजी रायकर चेअरमन इब्राहिम दरवाजकर,रामजी लिचम,शंकर पाटील,राजू पोतनीस,वसुली अधिकारी इब्राहिम इंचनाळकर,यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते ,आभार संस्थेचे सचिव सुभाष पाटील यांनी मानले..