मडिलगेतील महालक्ष्मी देवीची यात्रा १९/२० रोजी होणार उत्साहात संपन्न.
(तरुण मंडळाच्या कबड्डी स्पर्धेसह विविध स्पर्धेचे आयोजन. कबड्डी स्पर्धा प्रथम क्रमांकाचे २२ हजार बक्षीस सोबत शिल्ड. )
आजरा.- प्रतिनिधी.
मडिलगे ता. आजरा येथील सालाबादप्रमाणे होणारी महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार दि. १९/२० जानेवारी रोजी होणार संपन्न होणार आहे. दि. १९ रोजी मिरवणूक व शनिवारी दि २० रोजी मुख्य यात्रा दिवस सकाळी ७.वा. बळ दुपारी एक नंतर ओटी भरणे सायंकाळी ६ वा. गाराने व नैवेद्य असा यात्रेचा कार्यक्रम असेल अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वजीत मुंज यांनी दिली. यावेळी देवस्थान समितीचे सदस्य के व्ही येसने , शामराव निऊंगरे. गणपती पाटील ,विश्वास भाईगडे, गणपती आरळगुंडकर. कृष्णा मोहिते,भिवा गुरव, विजय कांबळे , प्रकाश कडगावकर अभिजीत मोहिते, सुशांत गुरव सह देवस्थान समितीचे सदस्य आजी-माजी अध्यक्ष उपस्थित होते.
