आजरा साखर कारखान्यांच्या नुतन संचालकांचा सत्कार समारंभ संपन्न.
(गवसेत कारखान्याचे शेती सेवा सेंटरचे उद्घाटन. )
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्यांच्या नुतन संचालकांचा सत्कार समारंभ रविवार दि. ७ रोजी संपन्न झाला. अध्यक्षस्थानी
माजी आमदार, के. पी. पाटील होते. आजरा कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर रवळनाथ विकास आघाडीला मिळालेल्या एकतर्फी विजयी निकाल हा आधाठीया बळ देणारा होता यासाठी हा भव्य दिव्य असा सत्कार समारंभ आयोजित केले होते. या कार्यक्रमाल खळनाथ आधाठीचे पॅनेल प्रमुख सुधीर देसाई यांनी कारखान्याच्या हितासाठी हा निकाल कसा फायदयाचा आहे. हे स्पष्ट करून स्थानिक संचालक मतदारांचे तऋण व्यक्त केले गोविंद पाटील यांनी आजऱ्याच्या पश्चिम भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या व आव्हाने मांडली व या शेतकऱ्यांना जंगली प्राठ्यांपासून होणाच्या नुकसानीला पायबंद घालण्यासाठी एक रोल मॉडेल गाव तयार करण्याचे अवाहन केले माजी आमदार श्री पाटील यांनी कारखाना आणि व्यवस्थापन यांच्या समोरील आव्हानावरती मात करून कारखान्याला ऊर्जातावस्था प्राप्त करून देण्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात संतोष पाटील, चेअरमन वसंतराव धुरे, गोविंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमात नुतन संचालक मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, उदयसिंह पवार, मारुती घोरपडे, अनिल फटके, राजेंद्र जोशीलकर, दिपक देसाई रणजीत देसाई, हरीबा कांबळे, सौ. मनिषा देसाई सौ. रचना होलम, संचालक व ग्रामस्थ तसेच समारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर रेळेकर, घाटकरवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांनी महत्त्वाचे योगदान दिले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी तर प्रास्ताविक व आभार ज्ञानेश्वर पाटील रोडे यांनी केले.

