HomeUncategorizedउर्दू विद्यामंदिर आजरा या शाळेच्या विध्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश. पंचायत समिती शिक्षण विभाग...

उर्दू विद्यामंदिर आजरा या शाळेच्या विध्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश. पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित स्पर्धा.🛑पलूस येथे बाबुराव जाधव तलाट्याला लाच घेताना रंगेहात पकडले – सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

🛑उर्दू विद्यामंदिर आजरा या शाळेच्या विध्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश. पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित स्पर्धा.
🛑पलूस येथे बाबुराव जाधव तलाट्याला लाच घेताना रंगेहात पकडले – सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

आजरा.- प्रतिनिधी.

पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा यांच्या वतीने तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा हत्तिवाडे येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उर्दू विद्यामंदिर आजरा या शाळेच्या विध्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
कथाकथन स्पर्धेमध्ये आमच्या उर्दू विद्यामंदिर आजरा शाळेची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु.जारा तोहीद माणगावकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. तिला वर्ग शिक्षक श्री. समिउल्ला शौकत नाईकवाडी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच समूहनृत्य स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थीनिनी तृतीय क्रमांक पटकाविला. समूहनृत्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीम. मिनाज नुरमहमद नदाफ यांचे मार्गदर्शन मिळाले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पंचायत समिती आजरा कडून आकर्षक शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
यशस्वी सर्व विध्यार्थ्याचे शाळेचे मुख्याध्यापक युनूस लाडजी, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

🛑पलूस येथे बाबुराव जाधव तलाट्याला लाच घेताना रंगेहात पकडले – सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

सांगली.-प्रतिनिधी

लोकसेवक श्री. बाबुराव बाळासो जाधव, वय-३९ वर्ष, तलाठी पलूस, ता. पलूस जि.सांगली यांना ३२,०००/- रुपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडले सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

तक्रारदार व त्यांचे वडील यांनी खरेदी केलेल्या जमिनीची ७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता लोकसेवक श्री. बाबुराव बाळासो जाधव, तलाठी पलूस यांनी तक्रारदार यांचेकडे ४०,०००/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी ०५.०१.२०२४ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी न्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक श्री. बाबुराव बाळासो जाधव, तलाठी पलूस यांनी तक्रारदार व त्यांचे वडील यांनी खरेदी केलेल्या जमिनीची ७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता ४०,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३२,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर दि.०८.०१.२०२४ रोजी तहसिल कार्यालय, पलूस या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक श्री. बाबुराव बाळासो जाधव, तलाठी पलूस यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून ३२,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने लोकसेवक श्री. बाबुराव बाळासो जाधव, तलाठी पलूस रा. बुली, ता. पलूस जि. सांगली यांचेविरुध्द सुरु आहे. पलूस पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही
सदरची कारवाई अमोल तांबे सो पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक, श्री. विजय चौधरी सो, अपर पोलीस उप आयुक्त अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.