मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालयची जागा बदलावी.- जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी (जनहित पार्टी व नागरिकांची निवेदनाने मागणी. )
आजरा.- प्रतिनिधी.

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय नव्याने होत आहे सदर वास्तूची जागा बदलावी अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी अखिल भारतीय जनहित पार्टीच्या व नागरिकांच्या वतीने निवेदनाने मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा लालुका हा दुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणून परिचित आहे. या तालुक्यात ग्रामीण रुग्णालय सध्या शहरापासून २ किमी अंतरावर गांधीनगर पोळगाव रोडवर आहे. सदर ग्रामीण रुग्णालय शहरापासून दूर व तालुक्याच्या गावपासुन दूर असे आहे, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा हे ८४ गावातील सर्व सामान्य जनतेसाठी आधारवड असणारे आहे. ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय हे ३० खाटवरून ५० खाटामध्ये श्रेणी वर्धन करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे त्यासाठी अंदाजे १७ कोटी २५ लाख रुपये निधि मंजूर करणेत आला आहे. सदरचे रुग्णालय हे शहरापासून तालुक्याच्या गावं पासून दूर असल्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी ये जा करणेसाठी आणि वाहतूक करणे साठी वाहतुकीचे साधने उपलब्ध नाहीत, त्यामुळे खाजगी वाहतुकीची न परवडणारी मदत घ्यावी लागते यासाठी सर्व सामान्य गरीब रुग्णांना रिक्षा व अन्य खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक गोर गरीब रुग्ण हे खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत, ही बाब भूषणवाह नाही येथे रुग्णालयाकडे मनुष्य वर्दळ कमी असल्याने रान डुक्कर साप हत्ती यांचा वावर वाढला असून डॉक्टर व कर्मचारी यांना स्वतच्या जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागते.
आजरा तालुक्यातील ८४ गावातील सामान्य जनतेला मोफत उपचारासाठी व वैद्यकीय सेवा सुविधेपासून वयोवृद्ध गरोदर माता यांना वंचित राहावे लागले ग्रामीण रुग्णालय व आजरा शहर यांच्या मधील अंतर व खाजगी वाहतूक भाड्यामद्धे ही भरमसाठ दर असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना या रुग्णालयाकडे पाठ फिरवली आहे असे दिसते.
तसेच उपचाराअभावी अनेक रुग्णांना मृत्युशी झुंज द्यावी लागते आजरा हा अतीदुर्गम भाग असल्याने या ठिकाणी लोक हिसक प्राण्यांचा वावर जास्त प्रमाणात असल्याने व त्यांचे हलयामध्ये जखमी रुग्णांना वेळेत उपचार करणेसाठी रुग्णालयामध्ये जाण्यासाठी वेळेत वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये जबर दस्तीने उपचारासाठी दाखल व्हावे लागते. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रभाकर कोरवी,शाहिद मुल्ला, शिवराज लोखंडे, प्रकाश कांबळे, राहील खेडेकर, आसिफ मुल्ला, उदय चव्हाण, सिकंदर अंकलिकर
अकाश लोखंडे, शरद लोखंडे
रोहित कोरवी, श्रीधर कळेकर
संदेश कळेकर यांच्या सह्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रती एकनाथजी शिंदे, (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.) तानाजी सावंत, (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.)
हसन मुश्रीफ, (कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री) प्रकाश आबिटकर, (आमदार, आजरा -भुदरगड)
राजेश पाटील (आमदार आजरा-चंदगड)
जिल्हाधिकारी कोल्हापूर. यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी महादेव कुंभार, अशोक जांभळे (पोवार) शहिद मुल्ला, रवि तळेवाडीकर, मिलींद लोबो, रसुल अब्दुल मुनला, सुनिल दोखगडे, सलिम ललिप, प्रसाद तेबी, अनिन वाजंत्री, रोहित कोखी, अरुण नाईक, अमित सुतार, साहिल मुल्ला धनाजी दळवी (सरपंच चाफवडे) संदेश कळेकर सिकंदर अंकलिकर कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
