Homeकोंकण - ठाणेविनापरवाना जळावू लाकूड मालाची अवैध बिनपासी वाहतूक. करतांना.- आजरा वनविभागाने केली.कारवाई. -...

विनापरवाना जळावू लाकूड मालाची अवैध बिनपासी वाहतूक. करतांना.- आजरा वनविभागाने केली.कारवाई. – स्मिता डाके वनक्षेत्रपाल आजरा.

विनापरवाना जळावू लाकूड मालाची अवैध बिनपासी वाहतूक. करतांना.- आजरा वनविभागाने केली .कारवाई. –
स्मिता डाके वनक्षेत्रपाल आजरा.
आजरा. प्रतिनिधी. ३०.

आजरा येथील वनविभागाच्या कारवाईत
दि. २९ रोजी रात्रौ हजगोळी- मडिलगे परिसरातून ट्रक क्रमांक KA -२३-A- २७०२ मधून विनापरवाना जळावू लाकूड मालाची इचलकरंजी येथे अवैध बिनपासी वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी सौ.स्मिता डाके वनक्षेत्रपाल आजरा यांना मिळाली त्यानुसार वनक्षेत्रपाल आजरा यांचे मार्गदर्शन खाली बी. एल. कुंभार, श्री. रणजीत पाटील, कृष्णा डेळेकर,नागेश खोराटे, तुकाराम जाधव, प्रवीण कांबळे,अनिल दळवी, सचिन कांबळे, गंगाराम कोकरे आदी कर्मचाऱ्यांच्या मदतीने मौजे उत्तूर येथे सापळा रचून आजरा – कोल्हापूर रोड वरील उत्तूर बायपास रोड या ठिकाणी ट्रक क्रमांक KA -२३-A- २७०२ या ट्रकची तपासणी करून ट्रक ड्रायव्हर रामदास बिरंजे, रा नौकूड वं ट्रॅकमध्ये सोबत असलेले ट्रक मालक वं लाकूड ठेकेदार आनंदा काटकर रा हजगोळी यांचेकडे जळाऊ लाकूड मालाचे पास परवाना बाबत विचारणा केली असता त्याने कोणत्याही प्रकारचा पास परवाना नसल्याचे कबूल केल्याने सदरचा ट्रक वं जळाऊ लाकूड २२.९३२ घ.मी.जप्त करून वनअधिकारी यांनी ताब्यात घेऊन सुलगाव रोपवाटिका येथे जमा केले आहे. सदरची कारवाई रात्री ठीक ११. ३० वा. केली.ट्रक मालक वं लाकूड ठेकेदार आनंदा काटकर रा हजगोळी वं ट्रक ड्रायवर रामदास बिरंजे यांचेवर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्हा नोंद केला करण्यात आला. अधिक तपास बी. एल. कुंभार वनपाल गडहिंग्लज वं नागेश खोराटे करत आहेत.
【 जप्त मुद्देमाल
१) ट्रॅक KA -२३ -A- २७०२, = ३,५०,०००/- किंमत
२) जळाऊ लाकूड – २२.९३२ घ.मी. / = २५.०००/- (बाजारभाव)
एकूण ३,७५,०००/- रु मुद्देमाल जप्त. 】

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.