HomeUncategorizedआजरा तहसील कार्यालयात ग्राहक दिन ग्राहक सप्ताह कार्यक्रम संपन्न.🛑 वाहन चालकांकडून अन्यायकारक...

आजरा तहसील कार्यालयात ग्राहक दिन ग्राहक सप्ताह कार्यक्रम संपन्न.🛑 वाहन चालकांकडून अन्यायकारक दंड वसुली रद्द करा. मनसेचे तहसीलदार यांना निवेदन.

🛑आजरा तहसील कार्यालयात ग्राहक दिन ग्राहक सप्ताह कार्यक्रम संपन्न.
🛑 वाहन चालकांकडून अन्यायकारक दंड वसुली रद्द करा. मनसेचे तहसीलदार यांना निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय आजरा, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने सदरचा ग्राहक दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते. स्वागत तलाठी वंदना शिंदे यांनी केले. यावेळी तहसीलदार माने म्हणाले ग्राहक संरक्षण कायदा अभ्यासणे काळाची गरज असून अनेक फसव्या जाहिराती, ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहार यामध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक कायदा सायबर कायदा अभ्यासणे गरजेचे आहे. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हा विभाग प्रमुख शिवाजी गुरव म्हणाले वास्तविक वीज मंडळ, एस्.टी महामंडळ, भूमी अभिलेख कार्यालय, बँक प्रतिनिधी या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणे गरजेचे होते सर्व विभागाची एक व्यापक बैठक बोलावून ग्राहक कायद्यावर चर्चा करावी व ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहकांच्या समस्या समजून घ्याव्यात अशी मागणी केली. ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अरुण यादव यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयावर मांडणी केली. यावेळी ग्राहक चळवळीचे देशपांडे सर, चंद्रकांत देसाई, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष महादेव सुतार, सुमन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आभार नायब तहसीलदार माळसाकांत देसाई यांनी मांडले.

🛑 वाहन चालकांकडून अन्यायकारक दंड वसुली रद्द करा. मनसेचे
तहसीलदार यांना निवेदन.

आजरा – प्रतिनिधी.

वाहन चालकांकडून अन्यायकारक दंड वसुली बंदसाठी मनसेचे आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन दंड आकारणी विरोधात आजऱ्यात वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करत मनसे जनहित जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे यांच्या नेतृत्वाखाली
सरकारने लागू केलेला अन्यायकारक वाहन चालकांच्या विरोधात असणारा नियम रद्द व्हावा. असे निवेदन म्हटले आहे. यावेळी आजऱ्यातील वाहन चालकांनी मनसे जनहित तालुका अध्यक्ष रिक्सन डिसोझा, शहर अध्यक्ष प्रशांत गजरे,जिल्हा संघटक सौ.पूनम भादवणकर,तालुका संघटक सौ. वर्षा चव्हाण,उपसंघटक सौ.वर्षा पाटील, आजरा शहर संघटक सौ. शोभा कांबळे,पर्वती उपविभाग अध्यक्ष सौ.जानकी मंडगावकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.