HomeUncategorizedआजरा कारखाना साखर चोरी प्रकरणात प्रशासन व संचालक मंडळ जबाबदार.- शेतकरी संघटना...

आजरा कारखाना साखर चोरी प्रकरणात प्रशासन व संचालक मंडळ जबाबदार.- शेतकरी संघटना ता. अध्यक्ष. माजी संचालक तानाजी देसाई. (साखर चोरी प्रकरणावरील चेअरमन यांचा खुलासा. हास्यास्पद)

आजरा कारखाना साखर चोरी प्रकरणात प्रशासन व संचालक मंडळ जबाबदार.- शेतकरी संघटना ता. अध्यक्ष. माजी संचालक तानाजी देसाई. (साखर चोरी प्रकरणावरील चेअरमन यांचा खुलासा हास्यास्पद )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखाना मध्ये दि २८ रोजी झालेल्या साखरेच्या चोरीला जबाबदार हे कारखाना प्रशासन व संचालक मंडळच आहे. याबाबतची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माजी संचालक तानाजी देसाई यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दि‌ १ जानेवारी २०२४ रोजी पत्रकार परिषदेत आयोजित केली होती यावेळी बोलताना श्री. देसाई म्हणाले चोरी प्रकरणावर चेअरमन यांनी खुलासा केला हा खुलासा हास्यास्पद. या खुलासा मध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक वगळल्या आहेत. साखर जाणीवपूर्वक बाहेर काढली आहे. यामध्ये साखर ही दोन प्रकारची असते कायदेशीर साखर व रिकवरी चोरून काढलेली साखर इतर कारखान्याप्रमाणे ही चोरी झालेली आहे. वजन काट्याच्या मार्गाने बाहेर काढली. दहा टनाचे बिलिंग केले. व वजन करून दोन हजार साखर बाहेर गेली कारखान्यामध्ये कामगारांची तपासणी केली जाते व आजही होते. कारखान्यातून एक नटबोल्ट बाहेर जाऊ शकत नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात व एवढ्या मोठ्या प्रकरणाची चौकशी का होत नाही. यामध्ये खोलात गेले पाहिजेत या प्रकरणी प्रशासन तर जबाबदार आहेच. चोऱ्या करणे चुकीचे आहे. संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील तपास केला पाहिजेत पंचनामा केला तर तुमचा त्यात हात आहे. की नाही किंवा चुकीच्या पद्धतीने कामकाज लक्षात येईल वरिष्ठ मंडळी तसेच जबाबदार ठेकेदार व्यापारी कोणत्या मार्गे साखर कुठे जाते याची आम्हाला भविष्यात चौकशी करावी लागणार आहे. काही कामगारांच्या चांगल्या प्रवृत्तीमुळे ही चोरी उघड झाली त्या कामगारांचे अभिनंदन तपास कमिटी प्रमुख यांनी गुन्हा नोंद केला पाहिजे ही साखर चोरीची आहे दोन टन काटा तुरीची साखर बिन बिलाची साखर बाहेर काढली कशी व अद्यापही गुन्हा दाखल केला जात नाही. व चेअरमन चुकीच्या पद्धतीने खुलासा देतात दुपारी एक दोन च्या दरम्यान चेअरमन निवड होते. व तीन वाजता साखर चोरी होते. बेरिंग चोरी प्रकरणात देखील असं झालं तसेच या प्रकरणात असंच आहे. यातील मुख्य आरोपी समजला पाहिजे यासाठी प्रथम गुन्हा दाखल करावा पण सभासदामध्ये असा प्रश्न पडला आहे. की यासाठी एक हाती सत्ता पाहिजे होती का? चेअरमन म्हणतात आम्ही साखर पकडली मुळात प्रश्न इथे आहे. साखर बाहेर गेलीच कशी पण कारखाना टिकला पाहिजेत प्रशासकीय यंत्रणेवर संचालक मंडळावर अंकुश राहायला पाहिजेत. याप्रकारे कुंपणच शेत खाऊ लागल्यानंतर काय करणार यासाठी प्रथम संबंधित व्यक्ती वरती गुन्हा दाखल करून तपास यंत्रणा अधिक तीव्र व्हावी. अन्यथा येणाऱ्या काही दिवसात याप्रकरणी शेतकरी संघटना आंदोलन उभे करणार असल्याचे यावेळी बोलताना श्री देसाई म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष संजय देसाई असेच नरेंद्र कुलकर्णी, सावंत श्रीपती गुरव सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.