Homeकोंकण - ठाणेएसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी - शनिवारी परिपत्रक जारी .

एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी – शनिवारी परिपत्रक जारी .

एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी – शनिवारी परिपत्रक जारी .

मुंबई – प्रतिनिधी. ३०.

कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकं पातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी वारसांकडून नोकरीसाठी एसटीकडे हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे महामंडळावर बरीच टीका झाल्यानंतर वारसांना अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात शनिवारी परिपत्रक जारी केले.
परिपत्रकानुसार,सेवेत असताना अन्य कारणांमुळे किंवा कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला नोकरी देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. रिक्त जागेची उपलब्धता पाहता महामंडळाने याबाबत निर्णय घेतला व त्याचे अनुपालन करावे, अशा सूचना राज्यातील एसटीचे सर्व विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक यांना दिल्या आहेत. एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सेवेत असताना कोरोना किंवा अन्य कारणांमुळे जरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपातत्त्वावर नोकरी दिली जाईलच. हे आधीही स्पष्ट केले होते. रिक्त जागा पाहता आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक जारी केल्याचे सांगितले.
दरम्यान,आतापर्यंत कोरोनामुळे एसटीतील एकूण ८ हजार ५८७ कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून २६५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ६७८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.