HomeUncategorizedआजरा कारखान्याच्या टेंडर मधील ओपन दरामधील हंगाम साखर घोटाळा प्रकरणी - खाते...

आजरा कारखान्याच्या टेंडर मधील ओपन दरामधील हंगाम साखर घोटाळा प्रकरणी – खाते निहाय चौकशी होईपर्यत संबंधित कर्मचारी निलंबित.- चे‌अरमन वसंतराव धुरे. यांची माहिती.

आजरा कारखान्याच्या टेंडर मधील ओपन दरामधील हंगाम साखर घोटाळा प्रकरणी – खाते निहाय चौकशी होईपर्यत संबंधित कर्मचारी निलंबित.- चे‌अरमन वसंतराव धुरे. यांची माहिती.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा कारखान्याच्या टेंडर मधील ओपन दरामधील हंगाम साखर घोटाळा प्रकरणी खाते निहाय चौकशी होईपर्यत संबंधित कर्मचारी निलंबित करत असलेली माहिती प्रसिध्दीपत्रका द्वारे चे‌अरमन वसंतराव धुरे यांनी दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कि दि.२७/१२/२०२३ रोजी मयुर ट्रेडर्स, कोल्हापूर यांना कारखान्याच्या टेंडर मधील ओपन दरामधील हंगाम २०२२/२३ मध्ये उत्पादीत झालेली १० मे.टन साखर विकी करणेत आली होती. त्यानुसार संबंधीत पार्टीने गाडी नं.एम.एम.०९ ए ९९९० साखर भरणेस पाठविली होती. सदरचा ट्रक शुगर सेल विभागाकडून डी.ओ. घेवून रिकामा ट्रक सुरक्षा विभागाकडे दु.३.३० वा. नोंद करून वजन काटयावर रिकाम्या वाहनाचे वजन करून गाडी भरणेस शुगर गोडावुन मध्ये भरणेस गेली असता १० मे.टन साखर भरणे आवश्यक होते. तसेच हिशोब विभागाकडून १० मे. टनाचे इन्व्हॉईस देणेत आले होते असे असतांना देखील शुगर गोडावून मधील क्लार्क यांनी सदर वाहनात (२४० बॅग) १२ मे.टन साखर भरली. सदर भरलेल्या वाहनाचे वजन केले असता १२.०१ मे.टन आलेची वजन स्लिप काटा क्लार्क यांनी संबंधीत वाहन चालकाकडे दिली. सदरची स्पिल वाहनधारकाने गोडावुन किपर यांचे हातात देवून गाडी बाहेर सोडणेसाठी कागद पत्रांची मागणी केली असता संबंधीत गोडावून किपर यांनी १० मे.टन वजनाचे गेटपास तयार करून संबंधीत वाहन धारकाच्या हातात दिले व सदरचे वाहन गेट वर येवुन सदर मालाची नोंद गेटवरील पुस्तकात संबंधीत सुरक्षा कर्मचारी यांनी करून सायं. ५.१० वाजता ट्रक बाहेर सोडला. त्यानंतर संबंधीत वाहनात १० मे.टना ऐवजी १२ मे.टन साखर भरलेचे संबंधीत क्लार्क यांचे लक्षात आलेनंतर त्यांनी सदरचे वाहन चालकास फोन करून साखर भरलेला ट्रक परत कारखान्यावर बोलविला. सदरचे वाहन कोणत्याही अधिकारी यांना सुचना न देता पुन्हा गेट मधुन आत घेणेबाबत गोडावुन विभागातील कर्मचारी यांनी संबंधीत गेटकिपर यांना ट्रक आत घेणेस सांगीतले. त्यानुसार सायंकाळी ६.०५ वा. ट्रक गेटच्या आत घेवून सदर वाहनातील ४० बॅगा म्हणजेच २ मे.टन साखर कोणतीही कल्पना न देता गोडावून मध्ये एका बाजुला उतरवुन पुन्हा सदर वाहनाचे वजन करून १०.०१ निव्वळ साखरेचे वजनासह वाहन बाहेर सोडणेस सुरक्षा विभागाकडे विचारणा केली असता सदरचे वाहन सोडणेसाठी अधिकारी यांचेकडून सुचना आलेनंतर वाहन सोडत असलेबाबत सांगीतलेने सदरचे वाहन गोडावून मध्येच लावणेत आले.
यानंतर संबंधीत गोडावून क्लार्क यांनी रात्री ७.०५ वा. फोन करून स्वतः कॉलनीत येवून प्र.कार्यकारी संचालक यांना सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यावर सदरचे वाहन आहे त्या स्थितीत ठेवुन याबाबतचा पदाधिकारी यांचेशी चर्चा करून निर्णय घेणेत येईल तो पर्यंत सदरचे वाहन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ठेवणेचे सुचित केले.
दि.२८/१२/२०२३ रोजी वरील प्रकार आपले निदर्शनास आलेनंतर कायदेशिर सल्लागार यांचे मत घेवून संबंधीत कर्मचारी यांना कारखान्यामार्फत कारणे दाखवा नोटीस दिली व त्यांना खाते निहाय चौकशी होईपर्यत निलंबित केलेबाबत कळविले आहे. सदर बाबत सखोल चौकशी करणेकरीता चौकशी अधिकारी नमणेबाबतचा विषय मा. संचालक मंडळापुढे ठेवणेत आला आहे अशी माहिती.चेअरमन वसंतराव धुरे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.